रिसोड बसस्थानक परिसरात आढळला बॉम्ब

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
रिसोड, 
Risod bus stand २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता चे सुमारास ठाणेदार, कर्मचारी व आरसीएफचे जवान मोठ्या संख्येने रिसोड बसस्थानक परिसरात येऊन त्यांनी शोध मोहिमेस सुरुवात केली. बसस्थानक परिसरात बॉम्ब आहे, असे प्रवाशांना समजताच प्रवाशांमध्ये मोठी धांदल उडाली. परंतु हे मॉक ड्रिल आहे, असे समजल्याने प्रवाशांनी सुटकेचा निस्वास टाकला.
 
 
Risod bus stand
 
वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भूषण गावंडे व त्यांचे सहकारी, आरसीएफचे जवान यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे, जनतेशी कशा प्रकारे संपर्क करून एखादी आपत्कालीन घटना घडल्यास प्रवाशांसाठी व जनतेसाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे याबाबत प्रात्यक्षिक होण्याच्या दृष्टीने मॉक ड्रिल केल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  Risod bus stand आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाने, आरसीएफ जवानाने कोणते कार्य केले पाहिजे. कशी खबरदारी घेतली पाहिजे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव या प्रशिक्षणातून पोलिस प्रशासन व आरसीएफ जवानांना मिळाला. ही घटना शहरामध्ये वार्‍यासारखी पसरली. हे सर्व पाहण्यासाठी बसस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली.