नवमतदारांचे प्रबोधन आवश्यक

new voters-ECI-Election 2024

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
कानोसा 
 
- अमोल पुसदकर
new voters-ECI-Election 2024 वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी शाळांमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेतले जाते. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहावी-बारावीनंतर काय अशा पद्धतीचे विषय घेतले जातात. नवविवाहित जोडप्यांचेही समुपदेशन केले जाते. new voters-ECI-Election 2024 ही सर्व कामे जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढेच महत्त्वाचे नवमतदारांचे प्रबोधन आहे. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष गेलेले दिसत नाही. जेव्हा विद्यार्थी १८ वर्षांचे होतात बरेचदा ते मतदान करायला जातच नाही. new voters-ECI-Election 2024 मतदानाच्या सुटीचा ते झोपून राहून आनंद घेतात किंवा मित्रांसोबत पार्टी करायला जातात. अनेक वेळा कारखान्यांमध्ये नोकरीला लागल्यावर त्यांना आज मतदान आहे, त्याची सुटी आहे, याचाच आनंद जास्त असतो. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत मतदान या विषयाशी त्यांचा संबंध येत नाही. new voters-ECI-Election 2024 एखादे जागरूक घर असेल आणि ते आपल्या सोबत आपल्या मुलालाही सांगत असेल की, तू जा आणि मतदान करून ये, तर त्या घरची मुले मतदान करून येतात. परंतु, आपल्या देशामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठी विषमता आहे.
 
 
 
new voters-ECI-Election 2024
 
 
एखाद्या ठिकाणी सुटी आहे म्हणून मुलांना झोपायला मिळते तर दुसऱ्या ठिकाणी अंग मेहनतीचे काम करणाऱ्यांना सुटीच नसते. सुटी असली तरी त्यांना दुप्पट पगाराचे प्रलोभन दाखवून कामावर बोलावले जाते. दुकानाचे दार बंद ठेवून आतून व्यवहार चालू असतात. new voters-ECI-Election 2024 आजही आपल्या देशामध्ये मतदानाबद्दल पाहिजे तेवढी जागृती झालेली नाही. संपूर्ण देशाचा मतदानाचा आकडा जर आपण बघितला तर त्याची टक्केवारी ६० पर्यंतच असते. यावरून असे लक्षात येते की, ४० टक्के जनता लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होत नाही. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या देशातील निवडणुका या लोकांच्या अज्ञानाचा, अशिक्षितपणाचा फायदा घेऊनच लढल्या गेल्या. जो अशिक्षित आहे, तो अशिक्षित राहिला पाहिजे. जो अडाणी आहे तो अडाणी राहिला पाहिजे. जो जसा आहे तसाच त्याला ठेवून त्याच्या त्या परिस्थितीचा उपयोग करीत निवडणुका लढल्या गेल्या.
 
 
new voters-ECI-Election 2024 त्यामुळे निवडणुका म्हटल्या की, झोपडपट्ट्यांमध्ये अन्नछत्र चालविले जायचे. दारूचा महापूर वाहवला जायचा. पैसे घेऊन मत देणे हीच गोष्ट मतदारांना माहिती झाली. काँग्रेसने मतदारांना व इतर राजकीय पक्षांना याच सवयी लावल्या. एका व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या मजकुरामध्ये लिहिले होते की, एका गावात मतदानाच्या दिवशी सूचना फलकावर लिहिले होते- म्हैस-१,०००,०० रुपये, बैल-५०,००० रुपये, गाय-४०,००० रुपये, डुक्कर-२०,००० रुपये व मतदार ५०० ते १००० रुपये आणि त्यानंतर लिहिले होते की, मतदारांनो आपली किंमत एवढी कमी करू नका. याचा अर्थ पैसे घेऊन मत देऊ नका ! new voters-ECI-Election 2024 आपण देश चालविणारे सरकार निवडून देणारे लोक आहोत. आपल्या देशामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांच्या मताचे मूल्य जेवढे आहे तेवढेच मूल्य रस्त्यावर खड्डा खोदणाèया मजुराचे आहे. ज्याच्याकडे जेवढी संपत्ती आहे तेवढे त्याच्या मताला जर मूल्य दिले असते तर भारतातील १० टक्के लोकांनी सरकार निवडून आणले असते व धनवानांचे सरकार आहे, असे आपण बोलू शकलो असतो.
 
 
 
राहुल गांधी नेहमीच बोलताना मोदी सरकारला अंबानी आणि अदानी यांचे सरकार म्हणतात. new voters-ECI-Election 2024 परंतु जसे मी आताच सांगितलेले आहे की, करोडो लोकांनी आपले मतदान करून मोदी सरकारला निवडून दिलेले आहे. त्यामुळे जर करोडो लोकांची इच्छा आणि त्यांचा निर्णय मोदी सरकार असेल तर त्या सरकारला अंबानी-अदानींचे सरकार म्हणणे हा मतदारांचा खूप मोठा अपमान आहे. ६० वर्षे काँग्रेसने या देशावर राज्य केले व त्यानंतर अनेक सरकारांमध्ये त्यांची सहभागीता होती. तर त्यावेळेला त्यांचे सरकार हे अंबानी, अदानी किंवा अझीम प्रेमजी यांचे सरकार नव्हते का? म्हणजे विरोधासाठी विरोध करत कुठल्याही भ्रम पसरविणाऱ्या गोष्टी लोकांमध्ये पसरविणे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. new voters-ECI-Election 2024 यावर्षी नवीन मतदारांमध्ये सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक नवीन मतदारांचा समावेश झालेला आहे. परंतु, या नवीन मतदारांना ते मतदार बनण्याच्या आधी शाळांमधून मतदानाचे महत्त्व काय? सरकार निवडण्यामध्ये आपली भूमिका काय? राजकीय पक्ष कशा पद्धतीचे प्रलोभन देऊ शकतात, जातिपातीचा प्रचार कसा करतात, हे सर्व सांगणे गरजेचे आहे. आपण जसे शाळांमध्ये ‘गुड टच' आणि ‘बॅड टच' शिकवतो तसेच मतदानाचे कर्तव्य बजावणे हे आवश्यक आहे, असे शिकविणे गरजेचे आहे.
 
 
new voters-ECI-Election 2024 नवीन मतदारांना हे सांगणे गरजेचे आहे की जर तुम्हाला कोणी उमेदवार मी तुमच्या जातीचा आहे म्हणून मला मतदान करा, असे सांगत असेल तर त्याच वेळेस आपण हे समजले पाहिजे की, हा आपल्या कर्तृत्वावर मतदान मागत नाही तर जातीवर मागत आहे. त्याला विचारले पाहिजे की, मागच्या पाच वर्षांत तू आपल्या जातीचे किती मेळावे घेतले? तुझ्या शिक्षण संस्थांमध्ये आपल्या जातीच्या मुलांना शैक्षणिक शुल्कामध्ये किती सवलत दिली? तुझ्या शिक्षण संस्थांमध्ये आपल्या जातीच्या किती लोकांना तू नोकऱ्या दिल्या? म्हणजे उद्योग करताना, व्यवसाय करताना तुला जातीची आठवण येत नाही. शाळा-कॉलेजेसमध्ये भरमसाट शुल्क आणि देणगी घेताना तुला जातीच्या उमेदवाराला सूट दिली पाहिजे, अशा पद्धतीची आठवण येत नाही. new voters-ECI-Election 2024 परंतु, ‘मला मत द्या,' असं सांगताना तू आवाहन मात्र ‘मी तुमच्या जातीचा आहे म्हणून मला मत द्या,' असे करतो. यावरून हा त्याचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. जातीशी त्याला काहीही देणेघेणे नाही, हे आपण ओळखले पाहिजे. आपण सामाजिक कार्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे जमा करायला सांगतो. त्यांना दिव्यांग व्यक्तींची मदत करायला सांगतो.
 
 
त्यांना वृद्ध व्यक्तीची मदत करायला सांगतो तसेच नवमतदारांना सांगितले पाहिजे की, तुम्ही घरोघरी फिरून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करा. जर कोणी वृद्ध स्त्री-पुरुष असेल तर त्यांना आपल्या गाडीवर मतदान केंद्रापर्यंत पोहोचवून त्यांचे मतदान करून घ्या. निवडणूक हा लोकशाहीचा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले पाहिजे तरच या देशामध्ये तरुणांसाठी शिक्षण, त्यांच्यासाठी उत्तम क्रीडा सवलती, नोकऱ्या, व्यवसाय, त्यांच्यासाठी नोकरी व शिक्षणासाठी लागणारे कर्ज उपलब्ध होईल. new voters-ECI-Election 2024 विविध सरकारी कामांमध्ये तरुणांसाठी म्हणजे तरुणांच्या विशिष्ट वयोगटातील लोकांसाठी काही काम आरक्षित करून देता येईल. जेणेकरून नुकतेच महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या  तरुणांना ताबडतोब सरकारच्या कुठल्या ना कुठल्या योजनेतून काम मिळेल व त्यांना पैसे मिळवण्याचा अनुभव मिळेल व सुरुवात चांगली झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. हे सर्व होण्यासाठी नवमतदारांनी घरात झोपून न राहता मतदान करणे, इतरांना मतदान करण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. यासाठी शाळा-कॉलेजेस, विविध संस्था यांच्या माध्यमातून प्रबोधन करणे गरजेचे आहे.new voters-ECI-Election 2024