आरमोरी,
armori-pattern-Gadchiroli आरमोरी पॅटर्नचा भविष्यात सुद्धा लाभ विद्यार्थांना कसा करून देता येईल, यासाठी सर्वांनी कासोशीचे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार यांनी केले. armori-pattern-Gadchiroli 14 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या शिबिराच्या अनुषंगाने उकृष्ट कामगिरी करणार्या महसूल कर्मचारी, शाळा आणि शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. armori-pattern-Gadchiroli याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्रीहरी माने, नायब तहसीलदार ललितकुमार लाडे, हरिदास दोनाडकर, उत्तरा राऊत, धनराज वाकुलकर, चंदु प्रधान आदी उपस्थित होते.
armori-pattern-Gadchiroli परिक्षाविधिन कालावधीमध्ये आरमोरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत असताना पवार यांनी विविध योजनांचा लाभ सर्व घटकांना तत्काळ कसा देता येईल, यासाठी आरमोरी पॅटर्नच्या धर्तीवर मिशन जात प्रमाणपत्र तथा निराधार लाभार्थी, श्रावणबाळ लाभार्थी व इतर योजनांचा लाभ सर्वसामान्यांना देण्याचा मानस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आरमोरी पॅटर्नमध्ये उकृष्ट काम करणारे 2 कोतवाल, 5 शिक्षक, 36 शाळा तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विशेष मोहीम अभियान राबविण्यात उकृष्ट काम करणारे 3 कोतवाल आणि 6 तलाठ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. armori-pattern-Gadchiroli कार्यक्रमादरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार यांचाही महसूल कर्मचार्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच पदोन्नती प्राप्त महसूल कर्मचार्यांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला. armori-pattern-Gadchiroli कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरमोरी तहसील कार्यालयाच्या सर्व कर्मचार्यांनी सहकार्य केले.