नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

05 Mar 2024 20:58:31
- रसिकांच्या मनोरंजनासाठी उमरखेड येथे महाराष्ट्राची हास्यजत्रा
- भव्यदिव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान महाशिबिराचे आयोजन

उमरखेड, 
यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांचे वाढदिवसानिमित्त 7 मार्च रोजी उमरखेड विधानसभेतील नागरिकांसाठी भरगच्च आशा कार्येक्रमांचे आयोजन Nitin Bhutda नितीन भुतडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. भव्य आशा सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान प्रामुख्याने विविध वृत्तवाहिनीवरून घराघरात पोहचलेला सुप्रसिद्ध ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ विनोदी शो देखील रसिकांच्या मनोरंजनार्थ जिप मुलांच्या शाळेच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता आयोजित केला आहे.
 
 
y5March-Nitin-Bhutada
 
6 मार्च रोजी महिलांसाठी भरड धान्यापासून डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन दुपारी 2 वाजता राजस्थानी भवनात करण्यात आले आहे. भरडधान्य डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये तर तृतीय पारितोषिक 2 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तर 7 मार्च गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता राजस्थानी भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे दरम्यान सर्व रोगनिदान व उपचार, रक्तदान महाशिबिर, हास्य जत्रा या विनोदी शोमधून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, माधुरी पवार, माया शिंदे तसेच हास्यसम्राट गौरव मोरे, अंशुमन विचारे, शिवाली परब, रोहित माने, प्राजक्ता हनमगर, प्रभाकर मोरे यांसह गायक अक्षदा सावंत, चेतन लोखंडे हे सर्व विनोदी कलाकार नितीन भुतडा यांच्या जन्मदिनानिमित्त उमरखेड शहरात दाखल होणार आहेत.
 
 
महागाव, उमरखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी सुप्रसिद्ध विनोदी कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याचे आवाहन नितीन भुतडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक‘माचे निवेदन प्रसिद्ध निवेदक जयंत भालेकर करणार आहेत. 9 ते 10 मार्च दरम्यान भव्य दोन दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, स्विमिंग पुलाजवळ करण्यात आले आहे. या स्पर्धेत 35 वयोगटातील दुहेरी स्पर्धेचे प्रथम बक्षीस 9 हजार 1 रुपये, द्वितीय बक्षीस 5 हजार 1 रुपये, पुरुषांच्या दुहेरी खुल्या गटात प्रथम बक्षीस 9 हजार 1 रुपये तर द्वितीय बक्षीस 5 हजार 1 रुपये नियोजित करण्यात आले आहे. यात नाव नोंदणीसाठी डॉ. भारत काळबांडे (9689203205), विनोद भारसाकळे (9420104474), बालाजी चिंचोळकर (9623490730), कैलास भांडारी (9423213946) यांच्याशी संपर्क साधावा व सर्व उपक‘मात मोठ्या सं‘येने सहभागी होण्याचे आवाहन Nitin Bhutda नितीन भुतडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0