- मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना
मुंबई,
पैठण येथील Sant Dnyaneshwar Park संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. या उद्यानाच्या विकास कामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यात समितीच्या शिफारशीनुसार विकास कामांच्या प्रस्तावात सुधारणा करून 149 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या पुनर्विकासासाठी 150 कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. Sant Dnyaneshwar Park संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित व सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार निवडीची निविदा प्रकि‘या पूर्ण करून सल्लागाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.