मेहकर,
Buldhana-rural phc येथील ग्रामीण रुग्णालयात येणार्या रुग्णांना योग्य प्रकारे तपासणी न करता कर्तव्यावर गैरहजर राहत असलेल्या डॉक्टरांना सत्ताधारी पक्षाचे आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी चांगलीच कान उघाडणी करून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली. Buldhana-rural phc गेल्या काही महिन्यापासून ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर शहरासह ग्रामीण भागातून रुग्ण येत असताना त्यांना योग्य उपचार न करता परस्पर बुलढाणा येथे हलविण्यात येत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे.
तसेच ग्रामीण रुग्णालयात असलेले डॉक्टर्स आपापल्या कर्तव्यावर हजर राहत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे तक्रारी आ. संजय रायमुलकर यांच्याकडे आल्याने त्यांनी आज ग्रामीण रुग्णालयात सर्व कर्मचार्यांची आढावा बैठक घेऊन संबंधित डॉक्टरांना चांगले धारेवर धरले. Buldhana-rural phc यावेळी विविध कारणामुळे तसेच अपघातामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकाकडून शव विच्छेदन करण्यासाठी कर्मचार्याकडून पाच ते दहा हजार रुपये घेत असल्याची तक्रार ही आल्याने आमदार संजय रायमुलकर यांनी कर्मचार्यांना चांगलाच शाब्दिक चोप दिला. ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपयांची किमतीचे असलेल्या ऑक्सिजन युनिट ही शोभेचे वस्तू म्हणून पडून आहे. Buldhana-rural phc
तसेच, दहा कोटी रुपये किमतीचे बांधण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटर इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे लक्षात आल्याने अधिकार्यांनाही त्यांनी खडसावले. Buldhana-rural phc ग्रामीण रुग्णालयातील विवाह नोंदणी करण्यासाठी येत असलेल्या लोकांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र हे ऑनलाईन मिळत नसल्यामुळे अनेक लोकांना ग्रामीण भागात जाऊन ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्याची वेळ येत आहे. Buldhana-rural phc तात्काळ लोकांना विवाह नोंदणीचे ऑनलाइन प्रमाणपत्र देण्याची सूचना ही आ. रायमुलकर यांनी यावेळी केली. यावेळी संबंधित डॉक्टर कर्मचारी व बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.