संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

06 Mar 2024 19:22:48
तभा वृत्तसेवा
यवतमाळ
Narhari Maharaj सर्व शाखीय सोनार सेवा महासंघाच्या वतीने स्थानिक नरहरी महाराज मंदिर येथे नरहरी महाराज यांची 738 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी मंगल स्नान, होम हवन, पूजा, महाआरती वैदिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. अजय चमेडिया, महासंघाचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, विदर्भ संघटक अरुण सागळे, विदर्भ संघटक सीमा बींनोड, जिल्हा महिला अध्यक्ष चारुलता पावशेकर, जिल्हा संघटक विकास जावळकर, सचिव नाना हर्षे उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. अजय चमेडिया यांनी सोनार व्यावसायिक, कारागीरांसाठी असलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण हर्षे यांनी केले. लक्ष्मीकांत लोळगे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी जुन्या पदाधिकार्‍यांना पदोन्नती तर काही नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

narhari maharaj
 
Narhari Maharaj यामध्ये विदर्भ सहसंघटकपदी गणेश सावरकर, जिल्हा कार्याध्यक्षपदी विकास जावळकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय सातपुते, जिल्हा समन्वयक किरण खरवडे , जिल्हा संघटक मंगेश खूने व संतोष रत्नपारखी, जिल्हा सहकोषाध्यक्ष गजानन गुगीलवर, जिल्हा महिला सह संघटक दीपाली पांचाळ, जिल्हा आयटी सेल महेंद्र रोकडे, यवतमाळ तालुका अध्यक्ष प्रशांत रोकडे, तालुका सचिव विक्रम भरणे, सहसचिव सचिन निनावे व पवन कुर्वे, कोषाध्यक्ष उमेश ढोमने, युवाध्यक्षपदी कुणाल मस्के यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून उदय सज्जनवार, विनय भरणे, मंगेश पोगडे यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन मंगेश खुणे व श्रद्धा लोळगे यांनी केले. रमेश महामूने यांनी आभार मानले. अभिलाष कोहलकर यांनी भोजन व्यवस्था सांभाळली. यावेळी सर्व शाखीय सोनार सदस्य उपस्थित होते, असे जिल्हामहासचिव प्रमोद बहाड यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0