तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
get together जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमाने 2 मार्च रोजी सर्व सहकारी परिवर्तनवादी संघटनांचे स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन सहकार भवनात करण्यात आले होते. यामध्ये विविध 29 परिवर्तनवादी संघटना सहभागी झाल्या होत्या. नवनियुक्त जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर तसेच सचिव म्हणून संजय बिहाडे, उपाध्यक्ष संजय गावंडे यांचा सत्कार विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी केला.
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणार्या जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थावर आजही परिवर्तनवादी संघटनेच्या रुपाने ही पतसंस्था परिवर्तनवादी संघटनेच्या ताब्यात आहे. गेल्या दोन वर्षाच्या आसपास पतसंस्थेचा आलेख लक्षात घेता पतसंस्थेने प्रगती केली असून परिवर्तन पॅनलने सहकार पॅनलची एकहाती सत्ता उलथून लावली व पतसंस्थेवर परिवर्तनवादी संघटनेचा झेंडा रोवला. या
परिवर्तनवादी विविध 29 संघटनांनी एकत्र येवून पुन्हा एकदा स्नेह मिलनातुन संघटनांची वज्रमुठ पहावयास मिळाली.
get together या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये विविध संघटनांतर्गत ज्येष्ठ नेते बाबासाहेब कपिले, उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, ज्ञानेश्वर नाकाडे, किशोर सरोदे, मधुकर काठोळे, पप्पू भोयर, गजानन देऊळकर, सिद्धार्थ भवरे, कुलदीप डंभारे, राधेश्याम चेले,
नदिम पटेल, आशन्ना गुंडावार, पुरुषोत्तम ठोकळ, सुनिता जतकर, राजेश उदार, दिवाकर राऊत, सुभाष लोहकरे, मुकेश भोयर, शरद घारोड, देवेंद्र चांदेकर, विलास राठोड, शहाजी घुले, नागोराव कोंपलवार, प्रवीण बहादे,इनायत खान, तेजस तिवारी, शशीकांत लोडगे, राजहंस मेंढे, प्रफुल फुंडकर, महेश जनबंधु, दयाशंकर चितळकर, मिलींद देशपांडे , दर्शन बेंद्रे, किरण मानकर, स्वप्नील फुलमाळी, मोरेश्वर लिखार, तुषार आत्राम, मंगेश फुटाणे, डॉ. संदीप तंबाखे, महेंद्र पाटील, राजकुमार भोयर, पुंडलीक रेकलवार, शरद टेंभेकर, विकास डंभारे, पुंडलीक बुटले, सुनिता बुटले इत्यादी विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. महेश सोनेकर, संदीप बिहाडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष महेश सोनेकर यांनी परिवर्तनातुन पतसंस्थेचे विकासात्मक परिवर्तन करणार असल्याचे प्रतिपादन केले. उपस्थितांचे आभार जिप कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संजय बिहाडे यांनी मानले. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.