- महिलांचे राज्यस्तर कबड्डी सामने
पांढरकवडा,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खेतानी फाउंडेशन व मित्र क्रीडा मंडळ पांढरकवडा यांच्या वतीने महिलांचे राज्यस्तर Kabaddi Matches कबड्डी सामने 10 मार्चपर्यंत मित्र क्रीडा मंडळाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते सलीम खेतानी यांची खेतानी फाउंडेशन व खेळातील अग‘गण्य संस्था मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व मुलींमध्ये कबड्डी खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, तालुक्यात व जिल्ह्यात कबड्डीच्या उत्कृष्ट, प्रतिभावंत महिला खेळाडू तयार व्हाव्या, या उद्देशाने महिलांकरिता राज्यस्तर कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
(संग्रहित छायाचित्र)
Kabaddi Matches या स्पर्धेसाठी विजेत्या संघास रोख पारितोषिक देण्यात येणार असून वैयक्तिक बक्षीसेसुद्धा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेनिमित्त शहरातील माजी महिला खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 41 हजाराचे प्रथम बक्षीस वैशाली नहाते, वंदना राय यांच्याकडून देण्यात येणार आहे. 31 हजाराचे व्दितीय बक्षीस माजी नगरसेवक समीक्षा अमर चोटपल्लीवार, श्रद्धा योगेश कर्णेवार यांच्याकडून, 21 हजारांचे तृतीय बक्षीस माजी नगरसेवक मंगला रवी सिडाम, माजी नगरसेवक उषा बालकिसन आत्राम यांच्याकडून तर 11 हजारांचे चतुर्थ बक्षीस माधुरी राजू वंजारी, सफीया, माजी नगरसेवक मोहंमद शब्बीर यांच्याकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त सं‘येने लाभ घेण्याचे आवाहन खेतानी फाउंडेशन व मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.