क्रांतिकारक बाबुराव शेडमाके जयंतीला भव्य शोभायात्रा

09 Mar 2024 19:15:28

तभा वृत्तसेवा

यवतमाळ, 

baburao shedmake सर्व आदिवासी समाजातील संघटनेच्या वतीने इंग्रजांना ‘सळो की पळो' करून सोडणारे स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या १९१ जयंतीनिमित्त १२ मार्च रोजी तलावफैल, गोदाम फैल येथून दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १८५७ च्या उठावात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांचा इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा लोखंडी पूलाजवळून प्रारंभ होऊन मेनलाईन, तहसील चौक, नेताजी चौक, बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून एलआयसी चौक, स्टेट बँक चौकातून चौसाळा रोड वाघापूर येथील क्रांतिकारक बाबुराव शेडमाके चौकात येणार आहे. नगर परिषदेतर्फे क्रांतीकारक बाबुराव शेडमाके यांचे शिल्पचित्र सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तेथेच संध्याकाळी ७ वाजता शोभायात्रेचा समारोप होणार आहे.


gtrgf 

baburao shedmake या भव्य शोभायात्रेत समस्त आदिवासी समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बाळू वेट्टी, माजी नगरसेवक राहुल मसराम,भास्कर मडावी, गजानन कोटनाके, बाळकृष्ण गेडाम, राहुल कुमरे, शंकर सयाम, निखिल जुगनाके, गुणवंता मेश्राम, महेश मडावी, मारुती कोकाटे, प्रकाश युवनाते, गोलू वेट्टी, सुनील कोडापे, विनोद मरापे, नाना करपते यांनी केले आहे, असे प्रसिद्धीप्रमुख कृष्णा पुसनाके यांनी सांगितले आहे.



Powered By Sangraha 9.0