'क्रू' चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये केला धमाल

    दिनांक :01-Apr-2024
Total Views |
मुंबई,  
Crew movie करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन स्टारर 'क्रू' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चर्चा होती. ट्रेलरने चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आणि आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याचे कलेक्शन चित्रपटाच्या यशाबद्दल बोलत आहे. पहिल्या दिवसापासून 'क्रू' चांगली कमाई करत आहे. चित्रपटाचे ओपनिंग वीकेंड कलेक्शन पाहण्यासारखे आहे.
 
Crew movie
 
'क्रू' हा एकता कपूर आणि अनिल कपूर यांनी निर्मित केलेला चित्रपट आहे. Crew movie हा चित्रपट एअरलाईन्समागील सत्य आणि एअर होस्टेसचा संघर्ष दाखवतो. करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करण्यासोबतच या चित्रपटाने इतर रिलीज झालेल्या चित्रपटांनाही तगडी टक्कर दिली.
तीन आघाडीच्या अभिनेत्रींना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाने दुहेरी अंकात आपले खाते उघडले. 'क्रू'ची सुरुवात 10.28 कोटी रुपयांपासून झाली. पुढचे दोन दिवस चित्रपटाचे कलेक्शन वाढतच गेले. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाचे अंतिम ओपनिंग कलेक्शन शेअर केले आहे. 'क्रू'ला तिकीट खिडकीवर हॉलिवूडचा 'गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर' आणि साऊथचा चित्रपट 'अदुजीविथम: द गोट लाइफ' यांच्याशी थेट स्पर्धा आहे. 'द गोट लाईफ'चे कलेक्शन 30 कोटींवर पोहोचले आहे. त्याचबरोबर 'गॉडझिला एक्स काँ' 40 कोटींच्या कमाईच्या जवळ पोहोचला आहे. याशिवाय 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि 'मडगाव एक्स्प्रेस'ही प्रदर्शित झाले आहेत, मात्र या सिनेमांचा प्रभाव काही विशेष दिसत नाहीये.