नवीन पाणीपुरवठा योजनेतून गढूळ पाणीपुरवठा!

Gondia-polluted-drinking-water आरोग्य धोक्यात

    दिनांक :01-Apr-2024
Total Views |
गोंदिया,
 
Gondia-polluted-drinking-water शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणीपुरवठा केला जातो. यासाठी कोट्यवधी रुपये किमतीची नवीन पाणीपुरवठा उभारण्यात आली. मात्र यानंतरही शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.Gondia-polluted-drinking-water  शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तालुक्यातील डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात नवीन पाण्याची टाकी उभारुन नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.
 
 
 

Gondia-polluted-drinking-water 
 (नळातून येणारे गढूळ पाणी)
 
 
Gondia-polluted-drinking-water या योजनेतंर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून शहराला दोन वेळेत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची ओरड, शास्त्री वॉर्ड, गोविंदपूर, छोटा गोंदिया आदी भागातील नळजोडणीधारक करीत आहेत. Gondia-polluted-drinking-water पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन नवीन असताना सुद्धा त्यातून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच मागील आठ ते दहा दिवसापासून शहराला अनिमयीत पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.Gondia-polluted-drinking-water