कर्करोगाशी लढण्यासाठी मिळेल बळ

HPV-uterus cancer मती गुंग करणारा अहवाल

    दिनांक :01-Apr-2024
Total Views |
वेध
 
- चंद्रकांत लोहाणा
HPV-uterus cancer कोरोना महामारीच्या काळामध्ये भारतामध्ये यशस्वी लसीकरण झाले. मानवतेच्या दृष्टिकोनातून जगातील कितीतरी देशांना भारताने कोरोना लस मोफत पुरविली. ‘वसुधैव कुटुम्बकम्' या भारतीय महामंत्राचा खरा अनुभव त्यावेळी संपूर्ण जगाने अनुभवला. HPV-uterus cancer कोरोना लस बनविताना भारताला अनेक आघाड्यांवर समस्येचा सामना करावा लागला. परंतु, त्यावर मात करीत भारताने अखेर यशाचे शिखर पादाक्रांत केले. HPV-uterus cancer या यशस्वी लसीकरणानंतर भारत सरकार गर्भाशयाच्या कर्करोगावर कमी किमतीमध्ये लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या गंभीर आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व मुलींना ही लस नि:शुल्क उपलब्ध करून देणार आहे. HPV-uterus cancer महिलांना मातृत्वापासून वंचित ठेवणारा हा दुर्धर रोग आयुष्यामध्ये अनेक संकटे सोबत घेऊन येतो. प्राथमिक पायरीवर जर या आजाराचे निदान झाले तर गर्भाशय काढून त्यावर मात केली जाऊ शकते. HPV-uterus cancer परंतु, त्या महिलेस मातृत्वाच्या कोमल स्पर्शास कायमचे मुकावे लागते. अन्यथा त्या महिलेस मृत्यूला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो.
 
 
 
HPV-uterus cancer
 
 
त्यामुळे हा आजार होऊच नये म्हणून लस हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. ‘इंडियन जर्नल ऑल कॅन्सर'मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार गर्भाशयाचा कर्करोग हा भारतामधील महिलांमध्ये कर्करोगाचा तिसरा प्रमुख प्रकार आहे. गर्भाशयाचा कर्करोग हा संपूर्ण जगामध्येही झपाट्याने वाढत असून त्याचे निदान झाल्यावर ४५ टक्के महिला फक्त ५ वर्षे आपल जीवन जगू शकल्या. भारतामध्ये सुरुवातीच्या काळात सर्वच आजारांवर दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अतिशय जास्त असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. HPV-uterus cancer महिलांमध्ये ज्यावेळी गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान होतं, त्यावेळी बराच उशीर झालेला असतो. हा झालेला उशीरच जीवघेणा ठरू शकतो, याची साधी कल्पनाही सुरुवातीला महिलांना नसते. त्यामुळे शेवटी कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्णास आपला जीव गमवावा लागतो. देशातील ८० टक्के ग्रामीण भागातील महिला वर्ग आजारांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा एक अहवाल असून तो मती गुंग करणारा आहे व अज्ञानतेपायी जिवावर बेतणारा आहे. HPV-uterus cancer त्यामुळे सुरुवातीलाच आजाराचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचाराने मात करता येऊ शकते.
 
 
गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात सामान्यतः स्त्री प्रजनन प्रणालीच्या अंडाशयामध्ये होते. या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. कधी कधी या आजाराच्या प्रगत अवस्थेमध्येही फार कमी अथवा किरकोळ लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अनेक महिलांना कर्करोगाची लक्षणे समजतच नाहीत. HPV-uterus cancer परंतु, ओटीपोटात दुखणे, पोटामध्ये गोळा येणे, वजन कमी होणे, थकवा येणे, पाठदुखी यांसारख्या लक्षणाचा त्यामध्ये समावेश होतो. अशी कोणतीही लक्षणे अधिक काळ किंवा  तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास महिलांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते. गर्भाशयाच्या कर्करोग हा पन्नाशी ओलांडल्यानंतर व ८० टक्के महिलांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर आढळून येतो. जागतिक स्तरावर दरवर्षी पाच लाख महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होतो, असा डब्ल्यूएचओचा एक अहवाल सांगतो. HPV-uterus cancer आपल्या देशामध्ये त्याचे प्रमाण जवळपास एक लाख असून मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.
 
 
तज्ज्ञांच्या मते ‘एचपीव्ही' नामक विषाणूच्या संक्रमणाने हा आजार बळावतो. कधी कधी अनुवांशिकताही त्यास कारणीभूत ठरू शकते. महिलांना हा आजारच होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी लागणारी ‘एचपीव्ही' ही लस कमी किमतीमध्ये विकसित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केंद्र सरकारद्वारे केले जात आहेत. HPV-uterus cancer तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार या लसीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ९० टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते. भारतामधील महिलांना हा आजारच होऊ नये, ही मनीषा बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामधील सर्व मुलींना ही लस मोफत देणार आहेत. देशातील प्रत्येक नागरिकांप्रती असलेली सरकारची ही जागरूकता आणि कटिबद्धता आपण यापूर्वी क्वचितच अनुभवली असेल.
 
९८८१७१७८५६