दिल्लीत बिबट्याचा शिरकाव, अनेकांवर हल्ला video

    दिनांक :01-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,   
Leopard enters Delhi पहिल्यांदाच दिल्लीत बिबट्या घुसल्याची बातमी समोर आली आहे. बुरारीच्या जगतपूर गावात बिबट्या घुसला, त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने अनेकांवर हल्ला केला आणि ते जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाच्या पथकाला घटनेची माहिती देण्यात आली. दिल्लीत पहिल्यांदाच बिबट्याने लोकांवर हल्ला केला आहे. केजरीवालांनी घेतले आपल्याच दोन मंत्र्यांचे नाव...
 
Leopard enters Delhi
  गोविंदाची भाची आरती सिंगची पोस्ट...आयुष्याची नवी सुरुवात  मिळालेल्या माहितीनुसार, वजिराबाद येथील आदर्श नगर गल्ली क्रमांक 3 जवळील जगतपूर गावात आज सकाळी 6.14 वाजता बिबट्या घरात घुसला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. Leopard enters Delhi स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. बिबट्याने 3 जणांवर हल्ला केला. ज्यांची ओळख पटली आहे. महेंद्र, आकाश आणि रामपाल यांच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सर्वजण जगतपूर गावचे रहिवासी आहेत. सध्या घटनास्थळी वनविभागाची टीम आणि अग्निशमन दलाचे सात जण स्थानिक पोलिसांसह उपस्थित आहेत. बचावकार्य सुरू आहे.  तिन्ही सैन्यांची एकत्र तयारी... जाणून घ्या कसे काम करेल