काँग्रेसच्या ट्विटर अ‍ॅडमीन व इतरांवर गुन्हा दाखल

Wardha-Election 2024-Tadas खा. तडस यांची बदनामी करणे भोवणार

    दिनांक :01-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
वर्धा,
 
Wardha-Election 2024-Tadas काँग्रेसने वर्धेचे खासदार रामदास तडस यांचा पाच वर्षांपूर्वीचा कथित व्हीडिओ बाहेर काढत 26 मार्च रोजी काँग्रेसच्या आयएमसीएममहाराष्ट्र (एक्स अकाऊंट) या अंकाउंटवरून आचारसंहिता लागू असताना खा. रामदास तडस व भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी रामनगर पोलिसात खा. रामदास तडस व भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. Wardha-Election 2024-Tadas त्यावरून काँग्रेसच्या काँग्रेसच्या ट्विटर अ‍ॅडमीन व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

Wardha-Election 2024-Tadas 
 
 
काँग्रेसच्या वतीने ऐन निवडणूक काळात व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. Wardha-Election 2024-Tadas तो व्हिडीओ 3 एप्रिल 2019 रोजी म्हणजेच जवळजवळ पाच वर्षापुर्वीचा असुन नागरिकांची दिशाभुल करण्याकरिता प्रसारीत करण्यात आला होता. आताही आचारसंहिता लागू असताना जनतेची दिशाभुल करून खा. रामदास तडस व भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या समाजमाध्यमावरून करण्यात आल्याने 27 मार्च रोजी रामनगर पोलिस स्टेशन येथे लेखी तक्रार करीत या प्रकरणाचा तपास नियमानुसार करून कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती.Wardha-Election 2024-Tadas 
 
 
5 वर्ष जुना असलेला व्हिडीओ व सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षाने निवडणुकीदरम्यान केलेली घोषणा या दोन्ही गोष्टीचा वास्तवीकतेशी कुठलाही संबंध नाही. Wardha-Election 2024-Tadas जुना व्हिडीओ आपल्या आवश्यकतेनुसार त्याची डिजीटल पद्धतीने कापणी करून सोशल मिडीयावर प्रसिद्ध करून आचारसंहितेच्या काळात जनतेमध्ये खोटी माहिती पसरवणे, भ्रम निर्माण करणे व लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलीन करणे या सर्व बाबी अत्यंत संवेदनशील आहे. काही जण हेतुपुरस्परपणे हे कृत्य करीत असुन या गुन्ह्याला खतपाणी देत आहेत. आचारसंहितेचे उल्लघंन झाल्याने खा. तडस यांनी तक्रार दाखल केली होती. Wardha-Election 2024-Tadas त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खा. तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयातून पाठवण्यात आलेले प्रसिद्धीपत्रकातून कळण्यात आले.