अमरावतीत पहिल्यांदा कमळ-पंजा लढत !

Amravati-Election 2024-BJP लोकसभेच्या निकालाचा प्रभाव

    दिनांक :10-Apr-2024
Total Views |
वेध
 
- गिरीश शेरेकर
 
 
Amravati-Election 2024-BJP अनुसूचित जातीसाठी आरक्षित अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. यंदाही तो गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. महायुतीतील भाजपा पहिल्यांदा व महाविकास आघाडीतील काँग्रेस २८ वर्षांनंतर हा मतदारसंघ ताब्यात घेईल का? Amravati-Election 2024-BJP घेतला तर उमेदवारी कोणाला मिळणार? या दोन प्रश्नांच्या भोवती ती चर्चा सुरू होती. अखेर काँग्रेस व भाजपाने हा मतदारसंघ वाटाघाटी करून आपल्याकडे घेतला आणि उमेदवारांची घोषणा केली. Amravati-Election 2024-BJP १९५२ ते १९८४ काँग्रेसचे या मतदारसंघावर सलग वर्चस्व राहिले. १९८९ ला भाकपाचा उमेदवार विजयी झाला. १९९१ ला पुन्हा काँग्रेसनेच या मतदारसंघावर कब्जा केला. १९९६ पासून काँग्रेसने रिपाइंचे रा. सू. गवई यांच्यासाठी या मतदारसंघातून माघार घेतली. Amravati-Election 2024-BJP आता २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसने निश्चयपूर्वक हा मतदारसंघ आपल्या कोट्यात घेऊन उमेदवार उभा केला आहे. जनसंघ व जनता पार्टीने तर या मतदारसंघात एकाही निवडणुकीत उमेदवार उभा केला नाही.
 
 
 
Amravati-Election 2024-BJP
 
 
पुढे १९८० मध्ये भाजपाची स्थापना झाल्यानंतरही भाजपाने येथे उमेदवार न देता शिवसेनेलाच हा मतदारसंघ दिला होता. १९९१ मध्ये शिवसेनेचा उमेदवार येथे पहिल्यांदा उभा राहिला. Amravati-Election 2024-BJP तेव्हापासून २०१९ पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण येथे होता. यंदा शिवसेनेत फूट पडल्याने व गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा येथे पराभव झाल्याने नव्याने वाटाघाटी झाल्या. भाजपाने हा मतदारसंघ आपल्याकडे घेतल्याने पहिल्यांदाच कमळ चिन्ह मतपत्रिकेवर झळकणार आहे. इतिहासात त्याची नोंद तर होईलच; सोबतच भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांची लढतही प्रथमच होत असल्याने त्याचीही नोंद होणार आहे. Amravati-Election 2024-BJP गेल्या दीड वर्षापासून भाजपाचे प्रमुख नेते अमरावती मतदारसंघात भाजपा निवडणूक लढवेल असे सांगायचे, पण उमेदवार काही सांगत नव्हते. त्यावर बरीच चर्चा झाली. अनेक नावे समोर आली. Amravati-Election 2024-BJP अखेर गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या नवनीत राणा यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यावर भाजपाचे गुपित समोर आले.
 
 
नवनीत राणा यांच्यासाठीच भाजपाने हा मतदारसंघ घेतला, यावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे काँग्रेसकडून अनेक नावे चर्चेत होती. यंदा विजय मिळवायचाच हा निर्धार करून काँग्रेसने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवार आता मैदानात उतरले आहेत. Amravati-Election 2024-BJP निवडणुकीचा प्रचारही सुरू झाला आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची राहणार आहे. कारण, काँग्रेस अनेक वर्षांनंतर व भाजपा पहिल्यांदाच हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी लढणार आहे. ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल, त्या पक्षाला अमरावती जिल्ह्यात स्वत:चा विस्तार अधिक व्यापक प्रमाणात करणे सोयीचे होणार आहे. Amravati-Election 2024-BJP याशिवाय पुढच्या काही महिन्यातच होणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकांवर लोकसभेच्या निकालाचा प्रभाव राहणार आहे.
 
 
पुढील सर्व राजकीय समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कमळ व पंजा अशी लढत होत असल्याने मतदारांमध्ये कमलीची उत्सुकता आहे, चर्चाही जोरात आहे. यंदाची निवडणूक अमरावती भाजपासाठी सुवर्णसंधी आहे. Amravati-Election 2024-BJP गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या तुलनेत जिल्ह्यात भाजपाचा आलेख सातत्याने खाली येतो आहे. आठपैकी फक्त एक विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. महापालिका व दहापैकी पाच नगर परिषदा वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा जेमतेमच आहे. ग्रामीण भागात भाजपाचा टक्का ज्याप्रमाणे अन्य जिल्ह्यांमध्ये वाढला, त्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात तो वाढलेला नाही. Amravati-Election 2024-BJP अनुकूल वातावरण असतानासुद्धा पक्षाचा विस्तार झालेला नाही? याची अनेक कारणे आहेत.
 
 
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला ती ज्ञात असल्यानेच त्यांनी अमरावती लोकसभा आपल्याकडे घेऊन भाजपाचा हक्काचा उमेदवार दिला आहे. लोकसभेत विजय मिळाला तर जिल्ह्यात पक्ष विस्ताराला गती मिळेल, अशी अपेक्षा भाजपाच्या नेतृत्वाला आहे. भाजपाचा उमेदवार विजयी होईल, या पद्धतीने वरिष्ठ स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे. Amravati-Election 2024-BJP स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी ही चांगली संधी आहे. लोकसभेत भाजपा विजयी झाली तर त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. एक हक्काचा प्रमुख लोकप्रतिनिधी मिळणार असल्याने सगळे कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. दुसऱ्या बाजूने काँग्रेसची सर्व मंडळी जोमाने धावत आहे. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, त्यानंतरच सर्व प्रश्नांची उकल होईल.Amravati-Election 2024-BJP
९४२०७२१२२५