‘जीआय' मानांकनाचे पाऊल पडते पुढे

India-GI Tagging महाराष्ट्रातील २९ पदार्थांना पेटंट

    दिनांक :10-Apr-2024
Total Views |
लक्षवेधी 
 
- मधुरा कुलकर्णी
India-GI Tagging शेती आतबट्ट्याची झाली आहे. ती परवडत नाही, अशी ओरड सुरू असते. त्यात तथ्यही आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा करून चालत नाही, तर त्यासाठी मजबूत प्रयत्न करावे लागतात. अलिकडच्या काळात शेतीमालाला चांगला भाव मिळतच नाही. सरकार त्यात हस्तक्षेप करत असते. India-GI Tagging या पृष्ठभूमीवर आता शेतकरीच आपापले मार्ग शोधायला लागले आहेत. काही ठिकाणी संशोधकही त्यांच्या मदतीला येत असतात. फिनलँडमध्ये शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण ४९ टक्के आहे. भारतात हे प्रमाण पाच टक्क्यांच्या आत आहे. India-GI Tagging शेतीमालाचे मूल्यवर्धन करायचे असेल, तर त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प वाढले पाहिजेत; परंतु तसे होताना दिसत नाही. त्यातही अन्य क्षेत्रात सुरू झाले, तसे शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी स्टार्ट अप्स सुरू झालेले नाहीत. India-GI Tagging शेतीमालावर प्रक्रिया करण्याच्या घोषणांची संख्या खूप आहे; परंतु त्या प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. त्यासाठीच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे काय झाले, याचा आढावा घ्यायलाही सरकारला वेळ नाही.
 
 
 
India-GI Tagging
 
 
India-GI Tagging शहरीकरणाचा वेग वाढत असताना ग्रामीण संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. शेतीत आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकèयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे वाढलेला कल आणि ग्रामीण भागातील वस्तूंना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळण्याचे वाढलेले प्रमाण हे चांगले लक्षण आहे. ग्रामीण संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शास्त्रज्ञ गणेश हिंगमिरे यांनी राज्यातील चिंच, जांभळासह पेणच्या गणपतीला पेटंट मिळवून दिले आहे. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी, यासाठी हिंगमिरे करीत असलेले प्रयत्न निश्चितच शेतकऱ्यांना उभारी देणारे आहेत. India-GI Tagging देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ पेटंट, अर्थात जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन (जीआय) मिळवून देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. महाराष्ट्रातील २९ पदार्थांना आधीच पेटंट मिळाले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ९ आणि बोडोलँडमधील १७ पदार्थांच्या जीआयसाठी अर्ज करण्यात आले. जीआय मिळविण्यासाठी संबंधित पदार्थांचा इतिहास, भूगोल आणि विज्ञान माहीत असणे आवश्यक असते.
 
 
India-GI Tagging ‘अ‍ॅग्रीकल्चर' आणि ‘नॉन-अ‍ॅग्रीकल्चर' अशा दोन प्रकारांच्या पदार्थांना, वस्तूंना जीआय मानांकन दिले जाते. चीन आणि युरोपच्या तुलनेत भारतात अतिशय कमी जीआय मिळाले आहेत. जीआय करण्यासाठी अर्ज करणे, छाननी करणे, अधिकृतता तपासणे, सादरीकरण करणे आणि निकाल देणे अशी प्रक्रिया पार पाडली जाते. भारतात आणखी नऊ उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये आसाममधील गामोचा, तेलंगणामधील तंदूर रेड ग्रामी, महाराष्ट्रातील अलिबाग येथील पांढरा कांदा यांचाही समावेश आहे. पाच भौगोलिक मानांकने एकट्या कर्नाटक राज्यातील शेतीविषयक उत्पादनांना देण्यात आली आहेत. India-GI Tagging भौगोलिक मानांकन म्हणजे नेमके काय? उत्पादकांना तसेच मूळ उत्पादनाला त्याचा काय फायदा होतो? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली पाहिजेत. एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला विशिष्ट ओळख असेल तर भौगोलिक मानांकन दिले जाते. कोणत्याही उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उत्पादकांना त्याचा फायदा होतो.
 
 
भौगोलिक मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. कारण, वेगवेगळ्या भौगौलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जाणारे एकच उत्पादन वेगवेगळ्या गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी भौगोलिक मानांकन महत्त्वाचे ठरते. India-GI Tagging भौगोलिक मानांकनामुळे उत्पादकाला अनेक अधिकार प्राप्त होतात. भौगोलिक मानांकनामुळे भेसळयुक्त उत्पादनाची निर्मिती तसेच विक्री करण्यास आळा बसू शकतो. दार्जिलिंग चहाचे उत्पादक अन्य ठिकाणी उत्पादित केलेल्या चहाला ‘दार्जिलिंग' या शब्दाचा वापर करण्यास मज्जाव करू शकतात. दार्जिलिंग येथे निर्माण होणाऱ्या चहाची गुणवत्ता अन्य ठिकाणी उत्पादित केल्या जाणाऱ्या चहाच्या गुणवत्तेपेक्षा वेगळी असते. याच कारणामुळे भौगोलिक मानांकनाच्या नियमांनुसार दार्जिलिंग चहाचे उत्पादक अन्य चहा उत्पादकांना ‘दार्जिलिंग' हा शब्द वापरण्यास मनाई करू शकतात. India-GI Tagging भौगोलिक मानांकनाचा उपयोग त्या त्या उत्पादनाच्या संरक्षणासाठी होतो. शेती, अन्न, वाईन, स्पिरिट्स, हस्तकला, औद्योगिक उत्पादने या क्षेत्रांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना भौगोलिक मानांकने दिली जातात.
 
 
 
भारतामध्ये सध्या एकूण ४३२ उत्पादनांना भौगोलिक मानांकने आहेत. यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, केरळ या राज्यांना सर्वाधिक भौगोलिक मानांकने मिळाली आहेत. भौगोलिक मानांकने मिळालेल्यांपैकी ४०१ उत्पादने मूळची भारतीय तर ३१ उत्पादने परदेशातील आहेत. कर्नाटक, तामिळनाडू यांच्याकडे सर्वाधिक भौगोलिक मानांकने आहेत, उत्तरप्रदेशकडे ३५, महाराष्ट्राकडे ३१ तर केरळकडे ३५ भौगोलिक मानांकने आहेत. India-GI Tagging दरम्यान, भारत सरकारने आगामी तीन वर्षांमध्ये भौगोलिक मानांकनाचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी जनजागृती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सरकारने ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भारतात भौगोलिक मानांकन मिळालेली अनेक प्रसिद्ध उत्पादने आहेत. यामध्ये बासमती तांदूळ, दार्जिलिंग  चहा, चंदेरी फॅब्रिक, म्हैसूर सिल्क, कुल्ली शॉल, कांग्रा चहा, तंजावूर पेंटिंग्ज, अलाहाबाद सुर्खा, फारुखाबाद प्रिंटस आदी उत्पादनांचा समावेश आहे. आसामच्या सहा पारंपरिक हस्तकला उत्पादने-वस्तूंना भौगोलिक मानांकन (जीआय) टॅग मिळाले आहे. यात बिहू ढोल, जापी (बांबूपासून बनविलेली पारंपरिक टोपी), सारथेबारी येथील बेल धातूची हस्तकला, आसाम अशारिकांडी तेराकोट्टा हस्तकला, आसाम मिसिंग हातमाग उत्पादने आदींचा समावेश आहे.India-GI Tagging
 
 
‘नाबार्ड', ‘आरओ' गुवाहाटीच्या मदतीने आसाममधील सहा पारंपरिक हस्तकला उत्पादनांचा जीआय तज्ज्ञ डॉ. रजनीकांत यांनी जीआय टॅग देऊन सन्मान केला आहे. India-GI Tagging या हस्तकलांना जीआय टॅग मिळावा यासाठी २०२२ मध्ये अर्ज दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनांमध्ये यावेळी बदलापूर, बाहडोळीची जांभळे, पेणच्या गणेशमूर्ती, लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरीचा समावेश करण्यात आला आहे. India-GI Tagging जालनाची दगडी ज्वारी, धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या कवडीला यामध्ये स्थान देण्यात आले आहे. राज्यातून पाठवलेल्या १८ प्रस्तावांना भौगोलिक मानांकन मिळावे, असे प्रयत्न सुरू होते. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कास्ती भागातील कोqथबिरीला एक प्रकारचा वेगळा सुगंध आहे. मुंबई, नागपूर या मोठ्या शहरांसह अन्य देशांमध्येही कोथिंबीर निर्यात करण्यात येते.
 
 
India-GI Tagging निलंगा तालुक्यात बोरसुरी हे गाव आहे. येथील वरण प्रसिद्ध आहे. या भागात बोरसुरी वरणाची मेजवानी करण्यात येते. त्याला ‘डाळ' असे संबोधले जात असले, तरी या गावातील वरणात टाकल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे याला नामांकन मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पानचिंचोली या गावातील चिंचेचा आकार सहा ते आठ इंचांपर्यंत असतो. गेल्या ३०० वर्षांपासून या गावातील चिंच प्रसिद्ध आहे. यावेळी त्याची वैशिष्ट्ये मांडण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कुंथल या शब्दाचा अर्थ कुरळा असा होतो. India-GI Tagging हा भाग डोंगराळ आणि कुरळ्या केसांच्या आकाराचा असल्याने येथे जनावरांची संख्या अधिक आहे. तुळजापूरला येणारे भाविक कवड्यांची माळ घालतात. स्त्री देवतांचे उपासक कवडी आवर्जून वापरतात. शिवाजी महाराज गळ्यात कवड्यांची माळ घालत. जालन्याची ज्वारी टणक असते. पक्ष्यांना ती सहज फोडता येत नाही. India-GI Tagging आता या वस्तूंना मानांकन मिळाल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.