मोदी सरकारनेच नक्षल्यांचे डोके ठेचले !

Naxals-Chattisgarh-ShriRam मंदिर उघडले

    दिनांक :10-Apr-2024
Total Views |
वेध
 
- नंदकिशोर काथवटे
Naxals-Chattisgarh-ShriRam दंडकारण्यात फोफावलेला नक्षलवाद रोखण्यात काँग्रेस सरकारला अपयश आले होते. नक्षलवादाला गांभीर्याने न घेतल्याने त्यावेळी छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात नक्षल चळवळीने आपले बस्तान पक्के केले होते. Naxals-Chattisgarh-ShriRam आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना जबरदस्तीने नक्षल चळवळीकडे ओढले गेले. त्यांच्या समस्या सोडविण्याच्या नावाखाली नक्षल्यांनी कितीतरी निष्पाप लोकांचा बळी घेतला. नक्षल्याच्या या चळवळीने कित्येक मुलांचा आधार हिरावला. अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करून दुर्गम भागांमध्ये आपली दहशत निर्माण केली. Naxals-Chattisgarh-ShriRam परिणामी या भागातील विकास खोळंबला आणि लोकं नक्षल्याच्या दहशतीखाली जगू लागले. पोलिसांनादेखील सरकारकडून पाठींबा मिळत नसल्याने नक्षल चळवळीची पाळेमुळे शहरापर्यंत पोहोचली; मात्र गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नक्षल्यांचे डोके चांगलेच ठेचले आहे. Naxals-Chattisgarh-ShriRam एकट्या गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत ३१६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून त्यांना बॅकफूटवर आणले आहे.
 
 

Naxals-Chattisgarh-ShriRam 
 
 
केंद्र सरकारने स्थानिक पोलिसांना सर्व प्रकारांच्या सोयी उपलब्ध करून नक्षलवादाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज केले. त्यांच्या मदतीला सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानांची फौज पाठविली. स्थानिक पोलिस व राज्य राखीव व केंद्र राखीव पोलिस दलाच्या मदतीने नक्षलवाद्यांना रोखण्यात सरकारला यश आले आहे. नक्षलवाद्यांनी विविध राज्यांत मांडलेला उच्छाद संपविण्यासाठी मोदी सरकारने पोलिसांना दिलेली ताकद खरंच कौतुकास्पद आहे. पोलिसांनी बुलेटसोबतच बॅलेटसाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहेच; प्रशासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठीही पोलिस विभागाने उभारलेले सोशल पोलिसिंग हे अस्त्र नक्षलवादाला रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. म्हणूनच छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील केरळपेंडा या नक्षलग्रस्त गावात १९७० मध्ये बांधण्यात आलेल्या मंदिरातील रामाचा वनवास २१ वर्षांनी संपला आहे. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे २००३ पासून रामाचे हे मंदिर बंद करण्यात आले होते. मात्र, सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा राम मंदिराचे दरवाजे उघडले आहेत.
 
 
Naxals-Chattisgarh-ShriRam सुमारे पाच दशकापूर्वी राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती बसविण्यात आल्या होत्या. मात्र, नक्षलवाद्यांच्या उद्रेकामुळे २००३ मध्ये हे मंदिर पूर्णपणे बंद करण्यात आले होते. ‘त्या' रामाला केवळ १४ वर्षांचा वनवास झाला; मात्र नक्षलवाद्यांनी ‘या' रामाला २१ वर्षे बंद करून ठेवले होते. Naxals-Chattisgarh-ShriRam अखेर सीआरपीएफ जवानांच्या मदतीने गावकऱ्यांनी मंदिराची साफसफाई करून हे मंदिर पुन्हा गावकऱ्यांसाठी खुले केले आहे. सुकमापासून सुमारे ८० किमी अंतरावर गावकऱ्यांनी डोक्यावरून सिमेंट, दगड, विटा आणि बांधकाम साहित्य पोहोचवून मंदिर निर्माण केले. नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांच्या आस्थेला हात घालत हे मंदिरच बंद करून टाकले. Naxals-Chattisgarh-ShriRam या गावातील ९५ टक्के लोकं रामावर श्रद्धा ठेवून मांसाहार आणि दारू पिणे टाळतात. एकेकाळी या गावात मोठी यात्रा भरत होती. अयोध्येतून ऋषी-मुनी येत होते. पण नक्षल्यांचा प्रकोप वाढल्याने आणि त्यांच्याकडून पूजाअर्चेला विरोध झाल्याने यात्रेसह सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद झाले होते.
 
 
नक्षल्यांनी मंदिराची विटंबना करून मंदिराला कुलूप ठोकले होते. Naxals-Chattisgarh-ShriRam यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी रामाचे हे मंदिर खुले करून आपण नक्षल्यांना भीक घालत नसल्याचे स्पष्ट केले आहे. गडचिरोली पोलिसांनी केंद्र सरकारच्या मदतीने जिल्ह्यातील नक्षलवादाला थोपवून धरले आहे. मागील १० वर्षांत सोशल पोलिसिंगच्या मदतीने गडचिरोलीतील नक्षलवाद कमी करण्यास पोलिसांना यश आले आहे. दादालोरा खिडकीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात गडचिरोली पोलिस सोशल पोलिसिंगमध्ये अव्वल ठरले आहे. Naxals-Chattisgarh-ShriRam अतिदुर्गम भागातील नक्षलवाद्यांची पाळेमुळे खोदून काढायचे असतील तर आपण लोकांच्या समस्या सोडविल्या पाहिजे. सरकारप्रती आणि पोलिसांविषयी जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करायची असेल तर त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात म्हणून पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यातील दुर्गम भागात सोशल पोलिसिंगला सुरुवात केली आणि त्याचा फायदा आता नक्षलवाद उधळून टाकण्यासाठी झाला आहे. Naxals-Chattisgarh-ShriRam या सर्व प्रक्रियेत केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
 
 
९९२२९९९५८८