राष्ट्रनिर्माणात पोहरागडची भूमिका महत्वाची : राजश्री पाटील

10 Apr 2024 21:40:14
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Rajshree Patil : बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागडच्या भूमीतून संत सेवालाल महाराजांनी समता व शौर्याची शिकवण दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शक्तीशाली राष्ट्रनिर्माणात पोहरागडची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असे प्रतिपादन महायुतीच्या लोकसभा उमेदवार राजश्री पाटील यांनी केले.
 

y10Apr-Poharadevi
 
वाशीम जिल्ह्यातील प्रचाराचा शुभारंभ राजश्री हेमंत पाटील यांनी पोहरादेवी येथे माता जगदंबा, संतश्री सेवालाल महाराज, संतश्री रामराव महाराज यांचे आशीर्वाद घेवून केला. यावेळी यवतमाळ व वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड व खा. हेमंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी संजय राठोड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत राजश्री पाटील यांनी, यवतमाळ वाशीमचा विकास हाच भाजपा, शिवसेना महायुतीचा निर्धार असल्याचे सांगोन संजय राठोड यांनी पोहरादेवीला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. भारतातील महत्वाचे तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ म्हणून पोहरादेवी येथे विकासकामे सुरू आहेत, याकडे लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पोहरादेवीच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत. देशातील बंजारा समाजबांधवांवर त्यांचे विशेष प्रेम आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत पोहरादेवी येथील विकासकामांचे लोकार्पण होणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.
 
यवतमाळ वाशीम जिल्ह्यांतील विकासकामांसाठी सर्वाधिक निधी आणल्याचे सांगून पालकमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्यासाठी महायुतीच्या उमदेवार राजश्री पाटील यांना लोकसभेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
 
यावेळी राकाँ प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, युवा नेते ज्ञायक पाटणी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काqलदा पवार, वाशीम जिल्हा परिषद गटनेता उमेश ठाकरे, जिप सदस्य विजय पाटील, अशोक चव्हाण, अजय जयस्वाल, भाजपा मानोरा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग, भाजपा कारंजा तालुकाध्यक्ष डॉ. राजू पाटील, भाजपा कारंजा शहर अध्यक्ष ललित चांडक, जितेंद्र महाराज तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0