विदर्भ-मराठवाड्यात पुन्हा बसणार अवकाळीचा तडाखा

10 Apr 2024 10:50:27
मुंबई,
Vidarbha-Marathwada weather विदर्भामध्ये पावसानं तडाखा दिला असून  त्याचे थेट परिणाम शेतकऱ्यांवर होताना दिसत असून गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना अवकाळीचा तडाखा बसला. तसेच पुढील 24 तासांमध्येही असेच वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी आणि विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी साधारण ताशळी 30-40 kmph वेगानं वारे वाहण्याचीसुद्धा शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अवकाळीच्या दृष्टीनं ही वातावरणनिर्मिती होत असल्यामुळं विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  संजय सिंह आणि भगवंत मान यांना केजरीवालांना भेटता येणार नाही!
 
rsain
 
महाकाल मंदिरातील आगीत होरपळलेले सत्यनारायण सोनी यांचा मृत्यू   विदर्भ पट्ट्यामध्ये असणारं अवकाळी हवामान वगळता राज्यात वातावरण कोरडं राहणार आहे. 9 ते 11 एप्रिलदरम्यान कोकण वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये वातावरण ढगाळ असेल, तर मुंबईमध्ये उकाडा दिवसागणिक वाढत जाणार आहे. त्यामुळं मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागांमध्ये दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा प्रशासन देत आहे. Vidarbha-Marathwada weather सध्या गुजरापतपासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, हा पट्टा महाराष्ट्रातूनच पुढे जात असल्यामुळं त्याचे परिणाम राज्यातील हवामानावर होताना दिसत आहेत. ज्यामुळं विदर्भातील तापमान काही अंशांनी कमी झालं आहे. तर, राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद सोलापुरात करण्यात आली आहे. तिथं मराठवाड्यात अवकाळी आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या धर्तीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  दुर्गमध्ये बस अपघातात केडिया कंपनीच्या १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Powered By Sangraha 9.0