मतदान वाढवा, भाजपाचे ब्रह्मास्त्र !

BJP-Election 2024-ECI विक्रमी मतदान झाले तरच...

    दिनांक :11-Apr-2024
Total Views |
प्रासंगिक 
 
 
- मोरेश्वर बडगे
BJP-Election 2024-ECI लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात रंगात यायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला जागावाटपाचा तिढा जवळपास संपला आहे. निवडणूक दोन-अडीच महिने चालणार आहे. मोजक्या जागा सोडल्या तर बहुतेक जागांवरचे उमेदवार दोन्ही आघाड्यांनी जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली आहे. BJP-Election 2024-ECI हे दोन्ही टप्पे विदर्भातले आहेत. म्हणजे विदर्भातील लढती कशा असतील, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाने ‘चारसौ पार'चा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपा भिडला आहे. BJP-Election 2024-ECI मात्र, भाजपा म्हणजे रालोआ २०० जागांच्या आत संपेल, असे विरोधी पक्ष म्हणतो आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यातल्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकायचे भाजपाचे लक्ष्य आहे. भाजपाचे नागपूरचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर पाच लाखांचा विजयी लीड कार्यकर्त्यांकडे मागितला तेव्हा काँग्रेसने तो चेष्टेचा विषय बनवला. BJP-Election 2024-ECI नागपुरात तेवढे मतदानच होत नाही तर पाच लाखांचे विजयी मताधिक्य कसे राहू शकते? असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यांची वैचारिक गरिबी समजू शकते. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांचा भाजपा या वेळची आपली तिसरी निवडणूक कशी लढतो आहे, हेच विरोधकांना लक्षात आलेले नाही.
 
 

BJP-Election 2024-ECI 
 
 
BJP-Election 2024-ECI आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायला तयार नाहीत. प्रत्येक बुथवर ७५ टक्के मतदान झाले पाहिजे, असा गडकरींचा आग्रह आहे. असाच आग्रह भाजपाचा देश पातळीवरही आहे. विक्रमी मतदान झाले तरच ‘चारसो पार' शक्य आहे. पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख यांसारखी यंत्रणा भाजपाने विकसित केली आहे. त्यामुळे भाजपा हे करू शकतो. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली; त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत रेकॉर्ड ब्रेक ६४ टक्के मतदान झाले होते. काँग्रेसने ४१५ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये मतदानाचा हा विक्रम तुटला. BJP-Election 2024-ECI नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी देशातील जनतेने तब्बल ६६ टक्के मतदान केले. गेल्या निवडणुकीत हे मतदान एक टक्क्याने वाढले. यावेळी नव्याने मतदार झालेल्यांची संख्या मोठी आहे. भाजपाने त्यांना लक्ष्य केले आहे. मतदान वाढते तेव्हा भाजपाला फायदा होतो, असा गेल्या दोन निवडणुकांचा अनुभव आहे. यावेळी ७० टक्के मतदान होईल, असा भाजपाचा जोर आहे. एक टक्काही मतदान वाढले तर सुमारे एक कोटी मतदान वाढते. BJP-Election 2024-ECI भाजपाने ‘चारसो पार'चा नारा हवेत दिलेला नाही. त्यामागे निश्चित रणनीती आहे. त्याचे परिणाम ४ जूनला दिसतील.
 
 
 
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक महाआघाडी विरुद्ध महायुती अशी करण्याचा प्रयत्न केला, पण जमले नाही. या निवडणुकीत शरद पवार संदर्भहीन झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे. उद्धव ठाकरे यांच्यापुढे पवार चक्क शरण गेल्याचे दिसत आहे. ठाकरेंनी जागावाटपात सर्वाधिक २१ जागा ओढून घेतल्या आहेत. BJP-Election 2024-ECI त्या फुकट जाणार तो विषय वेगळा. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी वळवण्यात भाजपाला यश येताना दिसते आहे. इथेच शरद पवार संपतात. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आणि तुम्ही म्हणजे शिवसेना नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मागे विरोधकांना सुनावले होते. आज तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. फडणवीसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून आपले शब्द खरे करून दाखवले. BJP-Election 2024-ECI लोकसभेच्या सध्याच्या रणधुमाळीकडे लोक आपापल्या पद्धतीने पाहत आहेत. सहा राजकीय पक्ष दोन आघाड्या करून मैदानात आहेत. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष आणि इतरही आखाड्यात आहेत. बारामतीची लढाई सर्वाधिक गाजते आहे. अनेकांना ही लढाई पवार कुटुंबातील वाटते. काहींना सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजय यांच्यातील वाटते.
 
 
 
BJP-Election 2024-ECI कोणाला दोन आघाड्यातील वाटते. प्रत्यक्षात ही लढाई नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील आहे. यंदाच्या निवडणुकीत उभी फूट पडली आहे. मोठ्या लोकसंख्येला नरेंद्र मोदी पुन्हा हवे आहेत तर इतरांना राहुल गांधी हवे आहेत. सुप्रिया सुळेंना मत देणे किंवा चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांना मत देणे म्हणजे राहुल गांधींना मत देण्यासारखे आहे. लढाई असे वळण घेते तेव्हा शरद पवार संदर्भहीन होऊन जातात. आज तेच झालं आहे. ४०-४५ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण स्वतःभोवती फिरवणारे शरद पवार आजच्या राजकारणात संपले आहेत. BJP-Election 2024-ECI कन्येच्या मोहापोटी शरद पवार अजूनही लुडबूड करतात तो भाग वेगळा. फडणवीस यांचे नाव ‘नाना' नाही. मात्र, त्यांनी राजकीय डावपेचात त्यांनी नाना फडणवीसांनाही मागे टाकले, असे म्हणावे लागेल. फारसे न बोलता पडद्याआड फडणवीस बरेच काही करून जातात. फडणवीसांचे ऑपरेशन अलिकडे सुरू झालेले नाही. अडीच-तीन वर्षांपासून सुरू आहे. BJP-Election 2024-ECI उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पकडून भाजपाशी दगाबाजी केली. मुख्यमंत्रिपदाच्या लोभापोटी युतीला जनतेने दिलेला कौल पायी तुडवला.
 
 
फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चांगलीच अद्दल घडवली. शरद पवारही पूर्ण फिटले. सत्ता तर गेलीच; पक्षही गेला. गेल्या निवडणुकीत गांधी परिवाराच्या हातून अमेठी गेली. आता नंबर बारामतीचा आहे. अजित पवारांना भाजपाने का सोबत घेतले? याचे कोडे आता उलगडते आहे. शरद पवारांचे फासे उलटे पडत आहेत. BJP-Election 2024-ECI विजय शिवतारे यांच्या हातून शरद पवारांनी पुतण्याला फटाके लावले. माढा लोकसभेचे चॉकलेट दाखवून महादेव जानकर यांना ओढले. पण या दोघांनाही देवेंद्र फडणवीस यांनी त्या तावडीतून हळुवार सोडवले. आता दस्तुरखुद्द शरद पवारच सापळ्यात अडकले आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वाधिक २१ जागा खेचल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी म्हणजे १० जागा मिळाल्या. BJP-Election 2024-ECI काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या असल्या, तरी त्या अडचणीच्या आहेत. जागावाटपात उद्धव ठाकरे आणि त्यांचे हनुमान खा. संजय राऊत यांनी दाखवलेल्या दादागिरीने काँग्रेसमध्ये खदखद आहे.
 
 
मुंबईतल्या एकूण सहा जागांपैकी ठाकरे गटाने चार जागा पदरात पाडून घेतल्या. दोन जागा काँग्रेसला दिल्या. पण त्या जागांवर डिपॉझिट जायची भीती असल्याने काँग्रेस नाराज आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही होत्या. जागावाटपात विश्वासात न घेतल्याने काँग्रेसवाले संतप्त आहेत. सांगलीच्या जागेसाठी तर काँग्रेसमध्ये बंडाची तयारी सुरू आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ चंद्रपूरची एक जागा जिंकता आली. यावेळी तिथेही चुरस आहे. मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठींबा जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंना घाम फुटला आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत बसली असती तर महायुतीला अवघड गेले असते. वंचित स्वतंत्र लढत असल्याने महायुतीला फायदाच होणार आहे.