नवेगाव नागझिरा अभयारण्यात सोडली वाघीण

    दिनांक :11-Apr-2024
Total Views |
भंडारा,
Navegaon Nagzira Sanctuary : व्याघ्र संवर्धन स्थानांतरण उपक्रमांतर्गत वन विभागाच्या वतीने आज 11 रोजी नवेगाव नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात एक वाघीण सोडण्यात आली.
 
bhanadara
 
 
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आलेल्या या वाघिणीला सॅटॅलाइट जीपीएस कॉलर लावण्यात आले आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज 11 रोजी वाघिणीला सोडण्यात आले. यावेळी अन्य अधिकारी उपस्थित होते. यापूर्वीही दोन वाघीण सोडण्यात आल्या आहेत.