राजकारणातील जंगल सफारी

Politics-Maharashtra-ECI मोदी यांच्यावर आगपाखड सुरू

    दिनांक :11-Apr-2024
Total Views |
वेध
- प्रफुल्ल व्यास 
 
 
Politics-Maharashtra-ECI दर पाच वर्षांनी येणारा लोकशाहीचा महोत्सव सुरू झाला आहे. विदर्भातही पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा धुराळा उडणे सुरू झाले. पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, सत्ताधारी आणि विरोधक असे या निवडणुकीतील महत्त्वपूर्ण घटक असले, तरी मतदारांशिवाय निवडणुकीला ‘अर्थ'च राहत नाही. Politics-Maharashtra-ECI याच महोत्सवात सामान्यातील सामान्य व्यक्तीचे महत्त्व वाढलेले असते. निवडणुकांमध्ये उमेदवार निवडणे हा सर्वात जिकरीचा विषय राजकीय पक्षांसाठी असतो. ‘एबी' फॉर्म ज्याच्या हाती मिळेल तोच उमेदवार होतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये वेळेवर एबी फॉर्मही बदलल्याची उदाहरणं आहेत. निवडणुकीत प्रचारच सामान्य नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतो. Politics-Maharashtra-ECI काही वर्षांपूर्वी निवडणुका केवळ जनहिताच्या जाहीरनाम्यावर लढवल्या जात होत्या. आज जाहीरनामा नाममात्र विषय ठरतो आणि विरोधकांचे उणेदुणे काढण्यातच धन्यता मानली जाते. Politics-Maharashtra-ECI राजकारण दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जाते आहे. निवडणुका म्हणजे काहीही करून निवडून येण्याचे आव्हान! त्यासाठी खालच्या पातळीवर प्रचार केला जातो.
 
 
 
Politics-Maharashtra-ECI
 
 
 
काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यावर काँग्रेसने चक्क हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला युक्तिवाद निश्चितच समजून घेण्यासारखा आहे. राज्यातले राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर गेले नाही. Politics-Maharashtra-ECI राजकारणात तात्त्विक वाद असू शकतात. हा अपघातच असून त्याची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. एकंदरीत हा अपघातही राजकारणात कळीचा मुद्दा करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होऊ लागला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी ‘शिवराळ भाषे'ची नव्याने नोंंद झाली. ही शिवराळ भाषा फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याच तोंडातून चांगली वाटत होती. आता तर बाळासाहेबांचे वारस नेमके चिडून काय बोलतात, हेच कळत नाही. Politics-Maharashtra-ECI आरोप-प्रत्यारोप कुठल्या पातळीवर जाईल, हे सांगता येत नाही. निवडणूक चिन्हापर्यंत मर्यादित असलेले प्राणी आता नेत्यांच्या ओठावर येऊ लागले आहेत. पंजा मिळण्यापूर्वी इंदिरा काँग्रेसला गाय-वासरू, एस. काँग्रेसला बैल-जोडी तर हिंदू महासभेला आक्रमक घोडा हे चिन्ह देण्यात आले होते तर बहुजन समाज पार्टीचे बोधचिन्ह हत्ती आहे.
 
 
Politics-Maharashtra-ECI महाराष्ट्रात शिवसेनेची ओळख डरकाळी फोडणारा वाघ अशी आहे. ही त्या त्या पक्षांची ओळख होती आणि आताही आहे. परंतु, आता निवडणूक प्रचारातही प्राणी उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीत राज ठाकरे यांना ‘शेळी' म्हटले गेले तर कुठल्या तरी एका सभेत नेत्यांची तुलना ‘साप आणि मुंगसा'सोबत गेल्याने चिन्हापर्यंत मर्यादित असलेले प्राणी नेत्यांच्या ओठावर गेल्याने निवडणुकांचा शिमगा झाला आहे. Politics-Maharashtra-ECI एक बोलला की त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरा तयारच असतो. त्यामुळे अनेकांना राजकारण नकोसे वाटू लागले आहे. तरुण या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात यावे, असे जाहीररीत्या म्हटले जात असले, तरी भावी पिढी याच मार्गावर गेल्यास या देशाचे भविष्य काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. Politics-Maharashtra-ECI आमच्या वर्धेतील खदखद मास्तरने स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू केले. कोरोना काळात त्यांचे व्हिडीओ यू ट्यूबवर चांगलेच गाजले अन् त्यांच्या डोक्यात हवा गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आगपाखड सुरू केली. आपली लोकप्रियता वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांना निवडणुकांचे स्वप्न पडू लागले.
 
 
Politics-Maharashtra-ECI त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवून प्रयोग केला आणि यावेळी चक्क लोकसभा निवडणुकीचे भूत त्यांच्या डोक्यात शिरले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी घडवणे सोडून त्यांनी राजकारणात उडी घेतली. विरोधकांवर खालच्या पातळीवर उतरत टीका करण्यात मास्तरने घेतलेल्या आघाडीला हेरून शरद पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात स्थान दिले. आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मास्तर बरळत फिरणार आहे. Politics-Maharashtra-ECI सत्ताधारी व विरोधकांनी प्रचाराची उंची कायम ठेवत मतदारांच्या भावनांचा विचार केला पाहिजे. राजकारण राजकारणच असावे. कोणाच्या घरातील वाद ऐन निवडणुकीत चव्हाट्यावर आणण्याचा नीचपणाही होऊ नये. अशा गोष्टी काही वेळ सनसनी होऊ शकतात, याचेही भान राजकारण्यांना असावे. निवडणुका म्हणा वा राजकारणाला कालमर्यादा असतात. Politics-Maharashtra-ECI एरवी प्रत्येकाचेच एकमेकाच्या तोंडावर तोंड पडते. त्यामुळे प्रचाराचा शिष्टाचार पाळल्या गेल्यास मतदानाचे पवित्र कार्य करताना मतदारांनाही समाधान होईल. कालपर्यंत निवडणूक चिन्ह असलेले प्राणी आता एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी नेत्यांच्या तोंडात जाऊन बसल्याने मतदारांना राजकारणातील जंगल सफारी होऊ लागली आहे. पण, हे चांगले संकेत नाहीत.
९८८१९०३७६५