धार्मिक कट्टरता, सैतानी मानसिकता

    दिनांक :12-Apr-2024
Total Views |
प्रहार
- इम्तियाज महमूद
Dharmik kattarata : 1988 साली ख्यातनाम लेखक सलमान रश्दी यांची ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ (सैतानाच्या ओव्या) ही कादंबरी प्रकाशित झाली होती. याबाबत इराणचे शिया नेते अयातुल्ला खोमेनी यांनी फतवा काढला होता. सलमान रश्दी हे ब्रिटिश नागरिक असल्याने युके सरकारने त्यांना ताबडतोब प्रचंड पोलिस संरक्षण उपलब्ध करून दिले आणि त्यांना अज्ञातवासात लपून बसण्यास सांगितले. कारण ब्रिटनमधील कट्टरपंथी मुस्लिम घटक रश्दी यांची हत्या करू शकत होते. एवढेच नव्हे तर जमावाने त्यांना बेदम मारहाण करण्याची दाट शक्यता होती. ब्रिटिश सरकारला याच्याशी संबंधित घडामोडी माहीत होत्या. जर इंग्रजांना हे सर्व माहीत असेल तर ते या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक पैलू शोधून काढतील अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.
 
 
Islam-1
Dharmik kattarata  : पाश्चिमात्य देशांच्या विचार स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा मुसलमान आदर करीत नाहीत. कोणता मुसलमान ईशनिंदा करणार्‍या व्यक्तीचा संभाव्य खुनी असू शकतो, हे ठरवण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. अशा कारणांमुळे मुसलमान निर्दयी जमावाचे रूप धारण करतात. त्यामुळे जर ब्रिटनला आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायम ठेवायचा असेल तर त्यांना आपल्या देशात होणारे मुस्लिमांचे स्थलांतर थांबवावे लागेल. म्हणजेच स्थलांतरित/निर्वासित मुस्लिमांना इंग्लंडमध्ये प्रवेश देण्यावर निर्बंध घालावे लागतील. खरे तर सर्वच पाश्चात्त्य देशांनी हे करायला हवे होते. परंतु त्याऐवजी त्या देशांनी मुसलमानांसाठी आपले दरवाजे पूर्णपणे उघडले आणि मुस्लिमांच्या कायदेशीर आणि बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिले. ब्रिटनमधील टोनी ब्लेअर आणि जर्मनीतील अँजेला मर्केल यांचेच उदाहरण घ्या. जरा विचार करा, पाश्चात्त्य देशांवर आज ही परिस्थिती का ओढावली?
 
 
भ्रष्टाचार ही डाव्यांची देणगी
याचे उत्तर त्या कालखंडात लपले आहे जेव्हा पाश्चिमात्य देशांतील सर्वाधिक शिक्षित, प्रगत, समृद्ध आणि सुखी देशांतील उच्चभ्रू वर्ग ते राज्य करत असलेल्या देशांचा नाश करू इच्छित होते आणि लोक फक्त टाळ्या वाजवत होते. 19व्या शतकात कार्ल मार्क्सच्या जन्मानंतर याची सुरुवात झाली. त्याने सर्वसामान्य जनतेला गोंधळात टाकले आणि अभिजन, उच्चभ्रू वर्गाला घाबरवले. त्याने संपत्तीच्या स्त्रोताचा चुकीचा अर्थ लावला, जमावाला उच्चभ्रूंवर वर्चस्व गाजवू दिले. त्यामुळे उच्चभ्रू वर्ग तडजोडी करू लागला. परिस्थिती अशी झाली होती की, एखाद्याने जर हिंसेची धमकी दिली तर समोरच्या व्यक्तीला त्याच्याशी तडजोड करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. बर्नहॅमच्या मते, हे मार्क्सवाद/साम्यवाद/डाव्यांच्या नैतिकतेच्या ‘द्वंद्वात्मक सिद्धांत’चे उच्चाटन देखील होते. बर्नहॅमने रॉजर किमबॉलच्या ‘सुसाईड ऑफ द वेस्ट’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (पृष्ठ 11 -किंडल आवृत्ती) लिहिले आहे की ‘‘हे केवळ एक साधन (उपकरण) आहे, जे घोषित करते की ‘जो कोणी कम्युनिस्ट राजवटीच्या हितासाठी काम करतो, तो सत्यवादी आहे’’.
 
 
पाश्चिमात्य जगतावर राज्य करणारे लिबरल (उदारमतवादी) मार्क्सवादी आहेत. त्यांच्यात कोणतीही नैतिकता नाही. त्यांच्या नैतिकतेच्या कल्पना सापेक्ष आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटकांसाठी त्यांचे वेगवेगळे नैतिक कायदे आहेत! त्यांनी याची सुरुवात त्यांनी औद्योगिक कामगारांपासून केली. वामपंथींच्या मते उद्योग आणि कारखान्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांचे शोषण होते, त्यामुळे त्यांना हिंसाचाराचा अवलंब करण्याचा अधिकार आहे. नैतिकतेचे सामान्य नियम त्यांना लागू होत नाहीत. ते औद्योगिक युनिट्समध्ये धरणे देऊ शकतात, ते उद्ध्वस्त करू शकतात, त्यांचा नाश करू शकतात आणि एवढेच नव्हे तर मालकांना देखील मारू शकतात कारण त्यांचे शोषण होते.
 
 
Dharmik kattarata  : परिणामी सत्ताधारी अभिजन वर्गाने माघार घेतली. कामगारांना औद्योगिक कारखाना जाळू दिला नाही तर ते संसद भवनावर मोर्चा काढून ते जाळून टाकतील अशी भीती त्यांना होती. ही नैतिक कायद्यांमधून सुसंस्कृत लोकांनी दिलेली पहिली सूट होती आणि तेव्हापासून यात सातत्याने घट झाली आहे. यामुळे पाश्चिमात्य देशांतील औद्योगिक घटकांचा विनाश आणि आश्रित वर्गाचा उदय झाला. काम करण्यात, कार्यरत राहण्यात एक गहन, जादुई गुण असतो. त्यामुळे काम करणार्‍यांमध्ये चरित्र व चारित्र्याची निर्मिती होते. मात्र, काम न करताच, परिश्रम न घेताच कल्याण व प्रगतीची अपेक्षा केल्याने पाश्चिमात्यांनी आपले चरित्र गमावले. त्याच वेळी, चोहोकडे ही गोष्ट पसरली की ‘पीडित’ किंवा ‘उत्पीडित’ असण्याने नैतिक कायद्यांमधून सूट मिळून जाते. अशा रीतीने उदारमतवाद्यांनी ‘पीडित वर्ग’ निर्माण करण्यास सुरुवात केली आणि लोक त्यात आनंदाने सामील होऊ लागले. येथे कुणाला नैतिकतेचा भार उचलायचा आहे? खूपच कमी लोक असे आहेत की जे संपत्तीचा स्रोत समजू शकतात. खूप चांगले अर्थतज्ञ देखील निधी प्रवाहित ठेवणारे स्रोत दर्शविण्यास अनेकदा अपयशी ठरतात.
 
 
पाश्चिमात्यांची सर्वात मोठी चूक
अर्थशास्त्राच्या दोन तत्त्वांवरून संपत्तीचा स्रोत समजू शकतो. पहिला आहे रिकार्डोचा श्रमविभागणीचा सिद्धांत आणि दुसरा कार्ल मेन्जरचा सीमांत उपयुक्ततेचा नियम. रिकार्डोचे तत्त्व असे सांगते की जर ‘ए’ आणि ‘बी’ या दोन्ही व्यक्ती वस्तूंचे उत्पादन केले आणि एकूण उत्पादन ‘सी’ असेल तर ‘सी’ मोठा होईल, जर दोन्ही व्यक्ती या गोष्टीशी सहमत असतील की त्यांच्यापैकी एक केवळ ‘ए’ वस्तू आणि दुसरा केवळ ‘बी’ वस्तूचे उत्पादन करेल. हे गणिताच्या समीकरणासारखे आहे, जे नेहमी बरोबर असते. दुसरीकडे, कार्ल मेन्जरचा नियम म्हणतो की कोणत्याही वस्तूचे आंतरिक आर्थिक मूल्य नसते, वस्तूचे संपूर्ण आर्थिक मूल्य व्यक्तिनिष्ठ असते.
 
 
हे दोन्ही नियम खाजगी मालमत्तेचे पावित्र्य, व्यापार स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य या गोष्टी अधिक मूलभूत मानतात हे स्पष्ट आहे. जर एखादी व्यक्ती जे उत्पादन करते ती त्याची वैयक्तिक मालमत्ता नसेल आणि ती व्यक्ती स्वत:च्या उत्पादनांचा व्यापार करण्यास स्वतंत्र नसेल, त्याला व्यापारात खरेदी करायच्या असलेल्या मालाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर कोणताही व्यापार शक्य नाही. त्यामुळे श्रमविभागणीही शक्य नाही. जर माणसाला विचार करण्याची आणि मनातील गोष्ट बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर आर्थिक वस्तूंचे मूल्यांकनही शक्य होत नाही. पुन्हा एकदा याचा अर्थ असा आहे की कोणताही व्यापार नसल्याने श्रमविभागणी शक्य नाही. म्हणजेच खाजगी मालमत्ता सुरक्षित नसेल तर समृद्धी देखील शक्य नाही आणि जर व्यक्तीची स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची बुद्धी, तिचे विचार स्वातंत्र्य, त्याची उत्पादने सुरक्षित आणि मुक्त नसतील तर त्याला व्यापाराचे, विचार करण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य नाही.
 
 
Dharmik kattarata  : खाजगी मालमत्तेचा अधिकार, व्यापाराचे स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यामुळेच पाश्चिमात्य देशातील नागरिक समृद्ध झाले आहेत. सत्यनिष्ठा, सचोटी, चारित्र्य आणि सन्मानाची भावना असलेल्या लोकांनी हे अधिकार निर्माण केले होते. पण जेव्हा कार्ल मार्क्सने असा दावा केला की संपत्ती शोषित कामगारांनी निर्माण केली, तेव्हा त्याच्या अनुयायांनी हिंसाचार सुरू केला आणि ते सर्व संपुष्टात आले. तोपर्यंत पाश्चिमात्य देशांवर भ्रष्ट उच्चभ्रू वर्गाचे राज्य होते. भष्टाचार संपवण्याऐवजी त्यांनी नैतिकताच संपवली आणि कामगारांना हिंसाचाराचा अधिकार दिला. त्यामुळे उच्चभ्र्रू वर्गाचा भ्रष्टाचार खालपर्यंत पसरला आणि सर्वत्र पोहोचला. हा अशा लोकांपर्यंत पोहोचला ज्यांना केवळ वस्तुस्थितीला सामोरे जावे लागले, जसे की विज्ञान क्षेत्रातील लोक.
 
 
आजचे डॉक्टर आणि विज्ञानाशी निगडित लोक सेवेच्या नावाखाली ‘लैंगिक अस्थिरते’च्या आडून सेवेच्या नावाखाली फसवणूक करून नव्या पिढीला विकृत करीत आहेत. शस्त्रक्रिया करणार्‍या सर्जनचे उदाहरण घ्या. आयुष्यभर विज्ञानाचा अभ्यास करणार्‍या शल्यचिकित्सकांना हे चांगलेच ठावूक आहे की मानवी शरीर 37.2 ट्रिलियन पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक व्यक्तीचे लिंग या पेशींद्वारे निर्धारित केले जाते आणि कोणतीही शस्त्रक्रिया किंवा समुपदेशन कोणत्याही परिस्थितीत ते बदलू शकत नाही. मात्र, असे असूनही, सर्जन शस्त्रक्रिया करून व्यक्तीचे ‘विकृतीकरण’ करतात. ही अत्यंत घृणास्पद फसवणूक ते आनंदाने स्वीकारत आहेत हे आश्चर्यकारक आहे. खरं तर पाश्चिमात्य जगताचा मृत्यू त्याच दिवशी झाला जेव्हा लिंग परिवर्तनाच्या नावाखाली फसववणूक झालेल्या डेव्हिड रीमरने आत्महत्या केली होती. डॉ. जॉन विल्यम मनी यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली होती.
 
 
काफिरांची ‘दुर्बलता’ इस्लामची ‘शक्ती’
विज्ञानातील भ्रष्टाचाराने लवकरच ‘हवामान बदल’ नावाच्या फसवणुकीला जन्म दिला, जी इस्लाम आणि जादूटोणा सोबत आणखी एक महामारी आहे, जी पाश्चिमात्य देशांवरही आघात करीत आहे. डेव्हिड रीमर प्रमाणेच जे लोक ‘हवामान बदलाची’ फसवणूक करणार्‍यांचा उघडे पाडत आहेत त्यांचा देखील नायनाट करण्यात येत आहे. कायद्याचा गैरवापर करून त्यांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. फसवणूक करणार्‍यांवर कोणतीही कारवाई होत नाही. अगदी आता आता पर्यंत, पाश्चात्त्य देशांत साहित्यिक चोरी हा करीअर संपवणारा गुन्हा मानला जात असे. मग ती चोरी शिक्षण, पत्रकारिता किंवा लेखनाचे क्षेत्र असो, जर कोणी साहित्यिक चोरी केली तर त्याची कारकीर्द लगेच संपुष्टात येते. आता संबंधित व्यक्ती अश्रू ढाळत आणि माफी मागत आपले स्थान राखते. आज बहुतेक श्रीमंत आणि लिबरल्स लोकांची बहुतांश मुले अयशस्वी आहेत, जे स्वत: काही करू शकत नाहीत. पण याच अयशस्वी लोकांनी राजकारण, शिक्षण, मीडिया, कॉर्पोरेशनमधील मानव संसाधन विभाग इत्यादींवर कब्जा केला आहे. नैतिकदृष्ट्या आणि चारित्र्यदृष्ट्या अधोगतीला गेलेले हेच लोक व्यवसायांचे नियमन करतात, विज्ञान क्षेत्रात मिळणार्‍या अनुदानांचे नियमन करतात, नोकरशहांच्या करीअरवर नियंत्रण ठेवतात, न्यायाधीशांची नियुक्ती करतात, मुलांना शाळांमध्ये शिकवतात आणि प्रसारमाध्यमांद्वारा प्रचार करतात. हेच लोक भ्रष्टाचार्‍यांना पकडतात, त्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांना थाराही देतात. भ्रष्ट उच्चभ्रूंच्या या दलदलीमुळेच आता पाश्चिमात्य देशांमध्येही इस्लाम फोफावत आहे. इस्लामला भ्रष्ट ‘काफिर’ उच्चभ्रूंपेक्षा अन्य काहीही पसंत नाही. सुरुवातीला इस्लामी अनुयायी सर्व प्रकारचे सहकार्य करतात. पण ते सत्ता वर्तुळाच्या बाहेर राहतात आणि उच्चभ्रू गटांना एकमेकांविरुद्ध उभे करून शक्तिशाली बनतात. मग एके दिवशी हे इस्लामी अनुयायी कुलीन, उच्चभ्रू लोकांच्या जवळ येतात आणि संधी मिळताच त्यांच्या माना मुरगाळतात.
 
 
Dharmik kattarata  : ‘काफिर समाजातील मतभेद’ हेच इस्लामचे मूळ बलस्थान आहे. म्हणून, इस्लाम अशा लोकांचा शोध घेऊन, त्यांचे पोषण करतो आणि त्यांना निधी प्रदान करतो, जे समाजात मतभेद निर्माण करतात आणि दोषरेषा (फॉल्ट लाईन) निर्माण करतात आणि ती रुंदावतात. आतापर्यंत पाश्चिमात्य विश्वाबाबत डावे जे करत होते, तेच आता इस्लामही करीत आहे. इस्लामने देखील डाव्यांचेच डावपेच अवलंबले आहेत. वामपंथींनी आधीच खराखुरा इतिहास पुसून टाकून पाश्चात्त्य आणि इस्लामभोवती एक ‘छद्म वास्तविकता’ निर्माण केली होती. वास्तविक, इस्लाम शिकार करण्यात पटाईत आहे, परंतु अनेक दशकांपूर्वी वामपंथींनी इस्लामला पाश्चिमात्यांचा बळी घोषित केले होते. त्यामुळे सुरुवातीला पाश्चिमात्य लोकांनी मुस्लिमांचे खुल्या दिलाने स्वागत केले. पण पुढे काय झाले? जर कोणताही हस्तक्षेप केला नाही तर आगामी काही वर्षांत पाश्चिमात्य देशांवर विविध स्वरूपात संकट कोसळू शकते. त्यामुळे पाश्चात्त्य देशातील नागरिकांनी सजग व सावध राहून धर्मांध व जिहादी प्रवृत्तींचा नायनाट केला पाहिजे.
(लेखक इंग्लंड येथील विचारवंत आहेत)
(पांचजन्यवरून साभार)