शिक्षकांनी विद्याथ्र्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावे : मंदार पत्की

    दिनांक :12-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Mandar Patki : यवतमाळ जिल्ह्यातील शाळा गुणवत्तेमध्ये कुठेही कमी पडू नये, यासाठी विद्याथ्र्यांची गुणवत्ता सुधारण्याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रमांसह स्पर्धात्मक परीक्षेचे दरवर्षी आयोजन केले जाते. तसेच जिप शाळा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात विखुरलेल्या आहेत.
 
 
y12Apr-Mandar
 
 
या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी यवतमाळ जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देत आहेत. यामध्ये १२ एप्रिलला यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत सावरगड येथील शाळेला सकाळी भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्याथ्र्यांचा वर्ग घेतला. यामध्ये त्यांनी इंग्रजी विषयाचे वाचन, संख्यांवरील क्रिया व खेळविषयक मार्गदर्शन केले व विद्याथ्र्यांशी हितगुज करून अध्यापनाचा प्रत्यक्ष आनंद घेतला.
 
 
या शाळा भेटीत सीईओ मंदार पत्की यांनी शिकविण्याचे कार्य केल्यामुळे त्यांच्या कृतीतून शिक्षकांनी असे अध्यापन करावे, असा संदेश उपस्थित शिक्षकांना दिला गेला. यावेळी पिण्याच्या पाण्यासह परिसर स्वच्छता, शौचालय स्वच्छता व विद्याथ्र्यांची गुणवत्ता तपासणी केली. यावेळी त्यांनी शिक्षकांनी विद्याथ्र्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे प्रतिपादन केले.
 
 
याप्रसंगी त्यांच्यासमवेत यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणधिकारी पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी नलिनी वंजारी व अरुण भोयर, केंद्रप्रमुख सारंग भटुरकर, मुख्याध्यापक विकास झाडे व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजहंस मेंढे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.