संस्कार भारती यवतमाळच्या सांजपाडव्याने रसिकांना रिझविले

12 Apr 2024 19:39:56
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sanskar Bharti Yavatmal : रंगमंच व ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत अखिल भारतीय संघटन संस्कार भारतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने भारतीय नववर्षाचा आरंभ दिन, गुढीपाडवा सांज पाडव्याने साजरा केला. देशाच्या विविध प्रांतातील लोकोत्सव तथा लोककला या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास मंचावर विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, यवतमाळचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, प्र. मा. रुईकर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रमोद देशपांडे, निर्मल सोलर चे ऋषिकेश पजगाडे, संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगीनवार, प्रांत महामंत्री विवेक कवठेकर, यवतमाळच्या अध्यक्ष डॉ. ललिता घोडे, मंत्री संजय सांबजवार व कार्यक्रम संयोजक भक्ती जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
Sanskar Bharti Yavatmal
 
 
पाडव्याच्या संध्याकाळी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ झालेला सांज पाडवा प्रचंड वादळ व पावसामुळे स्थगित करावा लागला. तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉ. नंदुरकर विद्यालय सभागृहात पूर्ण करण्यात आला. नटराज व गुढीपूजन तथा दीप प्रज्ज्वलनाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात शंभर कलावंतांनी विविध प्रांतातील लोकगीते आणि लोकनृत्य सादर करून भारतीय सण उत्सवांची परंपरा किती विविधांगी, रंजक व प्रबोधनपर आहे ते दाखवून दिले.
 

Sanskar Bharti Yavatmal
Sanskar Bharti Yavatmal 
 
सुरुवातीलाच झालेल्या ङ्कनमन नटवरा विस्मयकारा' या नांदी गीताच्या सुरेल सादरीकरणाने कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. त्यानंतर बांगला, कोकणी, राजस्थानी इत्यादी भाषेतील गीते गायक कलावंतांनी सादर केली. यामध्ये प्रा. डॉ. सौ. माणिक मेहरे, प्रा. डॉ.सौ. स्वाती जोशी, अपर्णा शेलार, भक्ती जोशी, साक्षी काळे, स्नेहल चव्हाण, लावण्या वखरे, श्रेया नंदुरकर, सई पंचभाई, आर्या लोणारे, अनघा लोणारे, राशी कांडूरवार, रिद्धी कांडूरवार, वर्धिनी अग्निहोत्री, रिंझेन मनवर, तेजश्री घानमोडे, प्रिया कांडूरवार, डॉ. नेहा चितावर, जया मनवर, कविता मोरके, कमलेश मुंदेकर, प्रदीप रुईकर, मयूर आकळे, मंथन गादेवार, अमोल कोळवणकर, राजू कोळवणकर यांचा समावेश होता. या गीतांना संवादिनीवर मयूर आकळे, कीबोर्डवर विशाल रामनगरिया, तबल्यावर अस्मित आकळे, ढोलकीवर सचिन वालगुंजे व ऑक्टोपॅडवर यश शहारे यांची साथ लाभली.
 
 
नृत्यविधा प्रमुख शिल्पा थेटे, मोहन भालदांड, प्रेम निनगुरकर, पूनम हर्षे यांच्या मार्गदर्शनात रामभजन, राजस्थानी, लावणी, सिक्कीम, आंध्र, कावडी अट्टम ही विविध प्रांतातील नृत्ये पद्माक्षी पुराणिक, अवनी घाटोळ, हर्षिका अहिर, अनन्या थेटे, श्रद्धा बद्रे, भैरवी भोय, स्वराली थेटे, सई भटकर, शौर्य पाठक, तन्वी परटक्के, तन्वी डाबरे, अध्याय लुले, ईश्वरी बुटले, अन्वेषा बोबडे, सान्वी लिंगमवार, इरा सावरकर, यशस्वी खापरकर, धनश्री येरावार, अवनी, स्वरा घोडे, मिन्नती पांचोली, काव्या पोरटकर, ज्ञाप्ती हर्षे, रिद्धी खेतान, प्रशांत पांढरे, मोहित आत्राम, लोकेश मडावी, आदित्य, समीक्षा रोकडे, श्रद्धा बद्रे, भैरवी भोय, दीप्ती लामकाशे, सानिधी बनसोड यांनी सादर केली.
 
 
डॉ. ललिता घोडे लिखित ङ्कमतदान केलेच पाहिजे' या लघुनाटिकेने लोकशाहीचा उत्सवातील मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. यामध्ये डॉ. ललिता घोडे, प्रिया कांडूरवार, चैताली सराफ, धवल रोहणे, सदानंद देशपांडे व विवेक कवठेकर यांचा सहभाग होता. सदानंद देशपांडे लिखित व ऋषिकेश निवल तसेच धवल रोहणे यांनी सादर केलेल्या प्रहसनाने प्रेक्षकांचे रंजन केले. संस्कार भारतीच्या भू-अलंकरण विधा संयोजक राजश्री कुलकर्णी व जान्हवी रानडे यांनी रेखलेल्या रांगोळी सह अरुण लोणारकर व प्रदीप गज्जलवार यांनी साकारलेल्या श्रीराम तथा छत्रपती शिवरायांच्या पोट्र्रेट रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधले होते.
 
 
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डॉ. कल्याणी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक दाते व अतिथी डॉ. योगेश देशमुख यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. वाणिज्य महाविद्यालय न्यासाच्या सुषमा दाते, ज्येष्ठ गायक प्रभाकरराव देशपांडे, आकाशवाणीचे प्रमोद बाविस्कर, नंदुरकर विद्यालयाच्या मुख्याध्यापक ज्योती बाविस्कर, अणे विद्यालयाच्या मुख्याध्यापक छाया पांडे, कृतिका वरणगावकर, अर्बन बँक संचालक मीरा घाटे, डॉ. हरिदास धुर्वे, चंद्रकांत गड्डमवार, नाट्यकर्मी राजाभाऊ भगत इ. मान्यवरांचे स्वागत यवतमाळचे कार्याध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, उपाध्यक्ष प्राची बनगीनवार, बाल आयाम प्रमुख जयंत चावरे, प्रांतमंत्री डॉ. ताराचंद्र कंठाळे, सहमंत्री निशिकांत थेटे, जीवन कडू यांनी केले. डॉ. ललिता घोडे यांनी प्रास्ताविक तर डॉ. माणिक मेहरे यांनी आभार मानले.
 
 
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ङ्कमी मतदान करणारचङ्क या मतदान जागृती सेल्फीस्टॅडने लक्ष वेधून घेतले होते. सुरुची कॅटरर्सच्या सुनील भुसार, पवन जवळेकर सहयोगाने झालेल्या या सांजपाडव्याला यवतमाळातील ५०० अधिक नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत कौलगीकर, विनय नायगावकर, चंद्रशेखर सवाने यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0