तभा वृत्तसेवा
हिंगोली,
Hingoli Lok Sabha हिंगोली लोकसभा मतदारसंघात पात्र 33 उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार असून, त्या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
यात नागेश बापुराव आष्टीकर शिवसेना (उबाठा) मशाल, गजानन धोंडबा डाळ (बहुजन समाज पार्टी) हत्ती, बाबुराव कदम (शिवसेना) धनुष्यबाण, विजय राम गाभणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) हातोडा विळा आणि तारा, अनिल देवराव मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी) किटली, अॅड. अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लीग) गॅस शेगडी, डॉ. बीडी चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) कपाट, वर्षा शिवाजी देवसरकर (बहुजन मुक्ती पार्टी) खाट. देशा श्याम बंजारा (समनक जनता पार्टी) जहाज, प्रकाश रणवीर मेशराम (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ए) शिवण यंत्र, रवी रामदास जाधव (अभिनव भारत जनसेवा पक्ष) शिट्टी, सुनिल दशरथ इंगोले (भीमसेना) ऑटो रिक्षा, हेमंत राधाकिशन कनाके (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी) रोड रोलर, त्रिशला मिलिंद कांबळे (बहुजन समाज पार्टी-आंबेडकर) गॅस सिलेंडर, Hingoli Lok Sabha अशोक पांडुरंग राठोड (अपक्ष) ईस्त्री, आनंद राजाराम धुळे (अपक्ष) ऊस शेतकरी, अंबादास सुकाजी गाडे (अपक्ष) फलंदाज, अ. कदिर मस्तान सय्यद (अपक्ष) कॅमेरा, दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी (अपक्ष) चिमणी, देवजी गंगाराम आसोले (अपक्ष) कढई, बाबुराव आनंद कदम (अपक्ष) बॅटरी टार्च, गोविंद फुलाजी भवर (अपक्ष) फुलकोबी. महेश कैलास नप्ते (अपक्ष) ट्रक, अॅड. रवी शिंदे (अपक्ष) दूरदर्शन, रामप्रसाद नारायण बांगर (अपक्ष) टेबल, अॅड. रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष) कोट, वसंत किसन पाईकराव (अपक्ष) सफरचंद, विजय ज्ञानबा राऊत (अपक्ष) जेवणाचे ताट, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर (अपक्ष) लॅपटॉप, अॅड. शिवाजी जाधव (अपक्ष) अंगठी, सत्तार पठाण (अपक्ष) तुतारी, सर्जेराव निवृत्ती खंदारे (अपक्ष) माईक व सुनिल मोतीराम गजभार (अपक्ष) बॅट याप्रमाणे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे, पक्ष व चिन्हे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.