ओळखपत्रे तपासून बसमधील 11 प्रवाशांची हत्या

13 Apr 2024 21:38:15
- पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रातांत थरार
 
कराची, 
Balochistan Case : क्वेटा येथून तफ्तानला जाणार्‍या बसला अडवून बंदूकधार्‍यांनी प्रवाशांची ओळखपत्रे तपासून त्यातील 11 जणांचे अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या केली. यातील 9 जण पंजाब प्रातांतील आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथील नोश्कीजवळ शनिवारी सकाळी ही थरारक घटना समोर आली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठी दहशत असून, मार्गावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे.
 
 
Balochistan
 
Balochistan Case : पोलिस उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांनी सांगितले की, नोश्कीजवळील सुलतान चरहाईच्या जवळ सुमारे 10-12 बंदूकधार्‍यांनी क्वेटा-तफ्तान महामार्ग जाणारी वाहने अडवली. यानंतर त्यांनी एका बसमधील प्रवाशांचे ओळपत्रे तपासली. बसमधील 11 प्रवाशांना बाहेर काढून त्यांचे अपहरण केले. काही अंतरावर असलेल्या डोंगरावर त्यांना नेण्यात आले आणि तेथे गोळ्या घालून ठार केले. अपहरण केलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या पुलाखाली सापडले असून मृतकांपैकी 9 जण पंजाब प्रांतातील आहेत. अलिकडेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने माच शहर, ग्वादर बंदर व तुर्बतमधील नौदल तळावर तीन हल्ले केले होते. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी सुमारे 17 अतिरेकी मारले.
 
अतिरेकी हल्ल्याची शक्यता
नोश्की पोलिस ठाण्याचे अधिकारी असद मेंगल यांनी सांगितले की, ही हत्या लुटीच्या संदर्भातून झाली का, याचा तपास सुरू आहे. मात्र, घटनाक‘म पाहता हा अतिरेकी हल्ला असू शकतो. या हत्येची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
Powered By Sangraha 9.0