दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका

    दिनांक :13-Apr-2024
Total Views |
- खंडणी प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
 
मुंबई, 
कुख्यात गुंड Dawood Ibrahim दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकर आणि दोन व्यावसायिकांची विशेष मोक्का न्यायालयाने 2019 सालच्या खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. पोलिसांकडून पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा आदेशही न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी दिला.
 
 
Dawood Ibrahim
 
Dawood Ibrahim : पोलिसांच्या आरोपांनुसार, तक्रारदार इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तूंची आयात करतो. व्यवसायिक टॉवेलवाला याच्याशी त्याची ओळख होती. त्याने तक्रारदाराचे 15 लाख थकविले होते. वारंवार मागणी करूनही रक्कम परत करीत नव्हता. 12 जून 2019 रोजी तक्रारदाराला दाऊदचा हस्तक छोटा शकील व कासकरने दूरध्वनीवरून फोन करून पैसे परत मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. दूरध्वनीवरील संभाषण न्यायालयात सादर करण्यात आले होते. टॉवेलवाला यानेही कबुलीजबाब देताना इतर दोन आरोपींसह गुन्हा केल्याचे कबूल केले होते. दरम्यान, या खटल्यात शकील याला फरारी आरोपी दाखविण्यात आले होते. कासकर आणि अन्य दोन आरोपींविरोधात 23 साक्षीदार तपासले व इलेक्ट्रॉनिक पुरावेही सादर केले. मात्र, आरोपींना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली.