महायुतीचा ‘मनसे’ प्रचार करणार

    दिनांक :13-Apr-2024
Total Views |
- राज ठाकरे यांची घोषणा

मुंबई, 
काही दिवसांपूर्वी Raj Thackeray राज ठाकरेंनी गुडीपाडव्याचा सभेतून महायुतीला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता ते थेट महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रचारार्थ उतरणार असल्याची घोषणा त्यांनी मुंबईत केली. महायुतीचा प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करायचा किंवा नाही, याबाबत मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या उमेदवराचा प्रचार करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
 
 
Raj Thackeray
 
सगळे म्हणत आहेत, Raj Thackeray राज ठाकरेंनी भूमिका बदलली. मात्र, याला भूमिका बदलणे असे म्हणत नाही, तर धोरणांवर टीका करणे म्हणतात. निवडणुकीपूर्वी सोबत राहून, निवडून आल्यावर इकडचे तिकडे बदलणे याला भूमिका बदल म्हणतात, असा टोला राज ठाकरेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. मी मुख्यमंत्रिपद हवे म्हणून किंवा माझे 40 आमदार फोडले म्हणून टीका केली नाही. ज्या भूमिका मला पटल्या नाहीत, त्यावर मी तेव्हा स्पष्टपणे बोललो, असे सांगत राज ठाकरे म्हणाले की, चांगल्या गोष्टी होताना दिसतात, तेव्हा एका बाजूला कडबोळे आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व. अशावेळी पुन्हा त्यांना एकदा संधी देणे आवश्यक वाटले आणि म्हणून मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
संपर्क साधल्यास प्रचार करणार
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा, कोणाशी बोलायचे आणि पुढे कशाप्रकारे जायचे, त्याची यादी दोन दिवसांत तयार होईल आणि ती त्यांच्यापर्यंत जाईल. त्यांनाही सोयीस्कर जाईल. संपूर्ण सहकार्य करायचे आहे. संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी माहिती Raj Thackeray राज ठाकरे यांनी दिली.
मोदी नसते तर राममंदिर झाले नसते
पंतप्रधान मोदी नसते, तर अयोध्येत राम मंदीर झाले नसते. राम मंदिराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सध्या अनेक विषय प्रलंबित आहेत. मोदी नसते तर राम मंदिराचा विषय असाच प्रलंबित राहिला असता. मोदी सरकारने एनआरसी, कलम 370 याबाबत काही निर्णय घेतले. अशा अनेक गोष्टींचे मी स्वागत केले. मी स्वत: फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे, अशा भावना Raj Thackeray राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.