सुषमा अंधारेंविरोधात कारवाईची मागणी

    दिनांक :13-Apr-2024
Total Views |
- राजकीय फायद्यासाठी लहान मुलांचा वापर

मुंबई, 
रामदास तडस यांच्या नातवाला मंचावर आणले म्हणून राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. राजकीय फायद्यासाठी निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्थ आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या Sushma Andhare सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. नागपूर येथे वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पत्रपरिषद घेताना सुषमा अंधारे यांनी तडस यांच्या 17 महिन्यांच्या नातवाला मंचावर उपस्थित केले होते.
 
 
Sushma Andhare
 
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतण अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी केंद्रीय मु‘य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांना पत्र लिहिले असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार, प्रचारसभा, मोर्चा, घोषणाबाजी, पोस्टर चिकटवणे अशा निवडणुकीसंदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही. राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी लहान मुलांना हातात धरून, वाहनात किंवा रॅलीमध्ये घेऊन जाणे तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये. Sushma Andhare सुषमा अंधारे यांनी राजकीय स्वार्थासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचे स्पष्ट होते. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून, आयोग स्तरावर याची चौकशी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुशीबेन शहा यांनी पत्राद्वारे केली आहे.