विदर्भवासी-पुणेनिवासीसाठी सशुल्क विशेष बस

    दिनांक :13-Apr-2024
Total Views |
- नागपूर येथे मतदान करण्यासाठी व्यवस्था
 
पुणे, 
Vidarbha-Pune Niwasi-Special bus पुणेनिवासी वैदर्भीय नागपूरकर युवकांना तसेच नागरिकांना 19 एप्रिलच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी विदर्भ मित्र मंडळातर्फे सशुल्क बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही पद्धत असून, प्रत्येक नागरिकाने मतदान करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाने आपली लोकशाही अधिक सशक्त बनते. देशाच्या हितासाठी मतदान करणे आवश्यक आहे.
 
 
matadan dksl
 
यावेळेसची लोकसभा निवडणूक म्हणजे देशाचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचे भवितव्य ठरविणारी असल्याने देशहितासाठी शंभर टक्के मतदान व्हावे तसेच हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई असा धर्माधारित भेदभाव न करता एक सशक्त सरकार पुनश्च निवडून यावे, याकरिता शंभर टक्के मतदान करणे गरजेचे आहे.
 
 
Vidarbha-Pune Niwasi-Special bus : सध्या नागपूरला जाण्यासाठी रेल्वे व बसेसची आरक्षणे फुल्ल आहेत. त्यामुळे सर्व अडचणींवर मात करून नागरिकांनी लोकसभा मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रबोधन मंच, विदर्भवासी पुणे निवासी, विदर्भ मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्यांची नावे नागपूर मतदार यादीमध्ये आहेत, पण सध्या पुण्यात नोकरीनिमित्त राहायला किंवा शिक्षण, व्यवसायासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी आले आहेत, अशांना नागपूरला 19 एप्रिल रोजीच्या मतदानाला जाण्यासाठी विदर्भ मित्र मंडळतर्फे सशुल्क बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी श्रीपाद उर्फ छोटू बोरीकर (9881200369 ) यांच्याशी किंवा 7517771369 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.