तभा वृत्तसेवा
वर्धा,
Wardha Lok Sabha Constituency : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील मतदार व सर्वसामान्य नागरिकांसाठी माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी तसेच निवडणुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामार्फत 13 एप्रिलपर्यंत 442 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षात 177 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये मतदार यादीशी संबंधित 32 तक्रारी असून वर्धा येथील 20, आर्वी येथील 2, हिंगणघाट 5 व संबंधित नसलेल्या 5 तक्रारींचा समावेश होता. विविध परवानगी संबंधित 3 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये वर्धा येथील 2, आर्वी येथील एका तक्रारींचा समावेश होता. आचारसंहितेसंबंधी 7 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये वर्धा येथील 6, हिंगणघाट येथील 1 तक्रारीचा समावेश होता. मतदार ओळखपत्राशी संबंधित 111 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये वर्धा येथील 59, देवळी येथील 8, आर्वी येथील 13, हिंगणघाट येथील 18 व संबंधित नसलेल्या 13 तक्रारींचा समावेश होता. इतर 24 तक्रारींमध्ये वर्धा येथील 4, देवळी येथील 2 व संबंधित नसलेल्या 18 तक्रारींचा समावेश होता. यासर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणालीवर 250 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये वर्धा येथील 25, देवळी येथील 62, हिंगणघाट येथील 47 व वर्धा येथील 116 तक्रारींचा समावेश होता. यासर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तसेच सीव्हिजील पवर 15 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार सीव्हिजीलवरील प्राप्त तक्रारीचे निराकरण 100 मिनिटांच्या आत करणे आवश्यक आहे. नियंत्रण कक्षाने या सर्व तक्रारींचे सरासरी 35 मिनिटांच्या आत निराकरण केले, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी अनिरुद्ध राजुरवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.