८८ हजार महिला मतदार बजावणार मतदानाचा हक्क

13 Apr 2024 19:54:03
कारंजा लाड,
Women voters : यवतमाळ - वाशीम या लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिलला मतदान होणार असून, ८८ हजार १० महिला मतदार निवडणूक रिंगणातील १७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहे.
 
 
DJSAKD
 
 
 
करंजा तालुयात १ लाख ८१ हजार ३१९ मतदार असून, त्यात ९३ हजार ३०५ पुरुष ,८८ हजार १० महिला आणि इतर मतदारांचा समावेश आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत महिला मतदारांची संख्या कमी असल्याने यंदाच्या निवडणुकीत ती वाढावी यासाठी तालुकास्तरीय निवडणूक विभागाच्या वतीने प्रयत्न करून महिला मतदारांच्या विशेष नोंदणीसाठी शिबिर राबविण्यात आले आणि त्याची फलश्रृती म्हणून कारंजा तालुयात महिला मतदारांची संख्या वाढली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ - वाशीम या लोकसभा मतदारसंघात ८८ हजार १० महिला मतदार निवडणूक रिंगणात असलेल्या राजश्री हेमंत पाटील, संजय देशमुख, हरीसिंग राठोड, अनिल राठोड, अमोल कोमावार, उत्तम ओंकार इंगोले, धरम ठाकुर, डॉ. अर्जुन राठोड, प्रा. किसन अंबुरे, गोकुळ चव्हाण, दीक्षांत सवाईकर, नूर अली मेहबूब अली शाह, मनोज गेडाम, रामदास घोडाम, विनोद नंदागवळी, संगीता चव्हाण व संदीप शिंदे या १७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद करणार आहेत.
Powered By Sangraha 9.0