समाज रसातळाला का जात आहे ?

drink and drive-Nagpur या कायद्याचे काय झाले आहे?

    दिनांक :13-Apr-2024
Total Views |
- डॉ.रिता सोनटके

घटना क्र.१ drink and drive-Nagpur
स्थळ : नागपूर
वेळ : रात्री ११.३० वाजता
अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत (?) घराण्यातील दोन महिला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवित असताना, दोन तरुण आपल्या दुचाकीवरून सामान्य गतीने जात असतात. त्या महिला सरळ त्या दुचाकीवर आदळत तरुणांना चिरडतात. ते दोघे जागीच ठार होतात. ही घटना चित्रपटातील नाही तर वास्तविक आहे.
घटना क्र. २ drink and drive-Nagpur
स्थळ : धारणी
वेळ : सायंकाळी ५ वाजता
मद्यप्राशन करून भरधाव चारचाकी चालविणाऱ्या चालकाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह त्यांच्या आईबाबांचा जागीच मृत्यू झाला. या दोन घटना केवळ वानगीदाखल आहेत. अशा बऱ्याच घटना राजच वाचण्यात येतात. मुळात प्रश्न असा आहे की, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह या गुन्ह्यासाठी असलेल्या कायद्याचे काय झाले आहे? त्या कायद्याला दररोज पायांखाली चिरडले जात आहे.
 
 
 
drink and drive-Nagpur
 
 
drink and drive-Nagpur अमेरिकेसारख्या देशात यासाठी खूपच कठोर शिक्षा आहे. त्यासाठी एक वर्षाचा सश्रम कारावास आणि ५०० ते २००० डॉलर्सपर्यंतचा जबरदस्त दंड वसूल केला जातो. त्यामुळे साधारणत: कोणीही अशी हिंमत करत नाही. अमेरिकाच काय पण, आपल्या भारतातही या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा आहेच. एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असेल आणि त्यामुळे झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास आरोपीवर ३०४ ए आणि २७९ या कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल होतो. तसेच, त्याला जामीनही मिळू शकत नाही आणि दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
 
 
drink and drive-Nagpur यक्ष प्रश्न तर पुढेच आहे की, इतके कठोर नियम असतानासुद्धा आपण कायद्याचे उल्लंघन का करतो? याचे कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि पैशाची धुंद ! कितीतरी श्रीमंत लोक यातून सहज सुटून जातात आणि राजरोसपणे आयुष्य जगतात. पैसे देऊन ते सहज अशा गुन्ह्यांमधून सुटतात. होळीच्या वेळी आम्ही शेगाव आणि कारंज्याला गेलो होतो. तेव्हा, महामार्गांवरील हॉटेल्समध्ये तूफान गर्दी ! विशेषत: महिला आणि मुलींची गर्दी ! हातात सिगारेट किंवा बिअरचा कॅन घेऊन उभ्या होत्या. इतरही अनेक ठिकाणी अगदी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा बायका नि:संकोचपणे मद्यप्राशन करताना दिसतात.
 
 
drink and drive-Nagpur कोणी म्हणेल यात ‘नवीन काहीच नाही. हे तर ‘कॉमन' आहे. चालतंच आहे.' पण, हे प्रमाण चिंताजनक असून दररोज वाढतंच आहे. आश्चर्य तर हे वाटतं की, मुलं-मुली अपरात्रीपर्यंत घराबाहेर असतात. ती कुठेहिंडतात, काय करतात? याचा आईवडीलांना तरी पत्ता असतो का? फॅशनच्या नावाखाली लहान आणि फाटके कपडे घालणारी ही तरुणाई कथित आधुनिकतेचा बुरखा पांघरून मद्य आणि इतर प्रकारचा नशा करते. याला जबाबदार कोण? पालक, मुलं की समाज ? पालकही याच आधुनिकतेच्या धुंदीत वाहावत जाणार असतील संस्कारांचा विषयच कुठे येतो? यांच्या आधुनिकतेच्या नशेत एखाद्याचा जीव जात असेल तर त्याचे काय?
 
 
drink and drive-Nagpur चौकाचौकात हेल्मेटशिवाय, ट्रिपल सीट, वाहन परवान्याशिवाय गाडी चालविणाऱ्या अगदी तरुण मुलामुलींना पोलिस थांबवितात. तेव्हा उर्मटपणे त्यांना पैशांची विचारणा करणारे, वरिष्ठांना फोन लावून बोलणं करवून देऊ का विचारणारे आणि ‘माझे वडील कोण आहेत, माहिती आहे का?' हा रूढ प्रश्न विचारणारे हे मुलं म्हणजे पालकांच्या संस्कारांवर लागलेले प्रश्नचिन्ह म्हणावे लागेल. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, नव्या पिढीत मूल न होण्याचे अर्थात इनफर्टीलिटीचे प्रमाण वाढले आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मुलामुलींमध्ये वाढलेली व्यसनाधीनता ! समाजाच्या अध:पतनाला आपण कुठेतरी थांबविले पाहिजे. यासाठी आणखी कठोर कायदे आणि तितकीच कठोर अंमलबजावणी व्हायला हवी.
 
 
drink and drive-Nagpur घरात सुसंस्कृत वातावरणाची निर्मिती करणं, ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पालकांनी स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणणे, खूप गरजेचे आहे. नव्या पिढीला जागृत करून, योग्य मार्गावर आणण्यासाठी फक्त सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच पुढाकार घ्यायचा आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये व्यसनाधीनतेविरोधात जागरुकता निर्माण करायची आहे. त्यासाठी, समुपदेशन करावं लागेल. व्यसनाधीनता आणि अपघातांचे वाढते प्रमाण परस्परांशी संबंधित आहे. हे टाळून एक सुदृढ समाज घडवू या !
 
९४२२८२७५४७