धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
- माढ्यातील समीकरणे बदलली
 
सोलापूर, 
Dhairyasheel Mohite Patil :  धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे माढ्यात भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. धैर्यशील मोहिते 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रणजिसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला सातार्‍यातून निंबाळकर आणि सोलापुरातून मोहिते पाटलांनी कडाडून विरोध केला होता.
 
 
Mohite Patil
 
गेल्या काही दिवसांपासून Dhairyasheel Mohite Patil धैर्यशील पाटील हे तुतारी हातात घेणार, अशी चर्चा रंगली होती. कार्यकर्त्यांकडून सुद्धा दबाव वाढला होता. या सर्व पृष्ठभूमीवर मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटीलही धैर्यशील यांच्या पाठीशी राहणार आहेत. संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकही शरद पवार गटाला साथ देणार आहेत. त्यामुळे माढ्यात राजकीय चित्र पूर्णतः पालटून गेले आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ देणार आहेत. ते सुद्धा शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार आहेत.