बोधचिन्ह मशाल घराघरात पोहचवण्याचे मोठे आव्हान..!

14 Apr 2024 20:03:50
पुसद,
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण हे बोधचिन्ह मिळालेे आहे. त्यामुळे उबाठा या शिवसेना Mashal symbol गटाला मशाल हे बोधचिन्ह मिळाले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे बोधचिन्ह माहीत होते. परंतु आता हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यामुळे उबाठाने मशाल हे बोधचिन्ह घेवून यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीत संजय देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरविले.
 
 
ubatha
 
Mashal symbol : दोन्ही शिवसेनेत लढत होत असताना मशाल हे बोधचिन्ह ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. इकडे महायुतीच्या उच्चविद्याविभूषित उमेदवार राजश्री पाटील यांच्याकडे धनुष्यबाण हे बोधचिन्ह असल्याने त्यांना प्रचार करताना बोधचिन्हाची अडचण होताना दिसत नाही. मागील 35 वर्षापासून बाळासाहेबांची व उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी होती या पक्षाचे बोधचिन्ह धनुष्यबाण होते. धनुष्यबाण या बोध चिन्हावर स्व. पुंडलिकराव गवळी हे एकवेळा तर भावना गवळी तब्बल पाचवेळा निवडून आल्या आहेत. महविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर ग‘ामीण भागातील तांड्या_ तांड्यात आणि वाड्या_ वाड्यात अजूनही 60 टक्के मतदार हे अशिक्षित आहेत. त्यांच्यापर्यंत मशाल हे बोधचिन्ह पोचविण्याची चांगलीच जवाबदारी येवून ठेपली आहे.
Powered By Sangraha 9.0