रामवीर चाहर यांना मिळाली पीएम मोदींच्या संकल्प पत्राची पहिली प्रत

14 Apr 2024 15:52:28
नवी दिल्ली,  
PM Modi resolution letter भाजपाने आज दिल्लीतील पार्टी कार्यालयात आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची पहिली प्रत झज्जरच्या पान केशो सिलानी गावातील शेतकरी रामवीर चाहर यांना दिली. पंतप्रधानांच्या संकल्प पत्राची प्रत मिळवणारा रामवीर हे  शेतकरी आहे. रामवीर यांनी सांगितले की, पंतप्रधानांना भेटणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही.

PM Modi resolution letter
त्यांनी आज दिल्लीतील भाजपा पार्टी कार्यालयात पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी रामवीर याना विचारले, कसे आहात? कुटुंबातील सर्वजण कसे आहेत? यावर रामवीर म्हणाला की सर्वजण आनंदी आहेत. यानंतर पंतप्रधानांनी विचारले तुम्ही कोठून आहात? रामवीरने तो हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील सिलानी गावातील असल्याचे सांगितले. यानंतर पंतप्रधानांनी विचारले की सरकारच्या योजनांचा लाभ मिळत आहे की नाही? योजनांचा लाभ मिळत असल्याचे रामवीर यांनी सांगितले. PM Modi resolution letter रामवीरने सांगितले की, पंतप्रधानांना फक्त टीव्हीवर किंवा मोठ्या पडद्यावर पाहिले होते. आज पहिल्यांदाच पंतप्रधान त्यांच्यासमोर होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्यांना भेटलो. पंतप्रधानांनीही त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
रामवीर यांनी सांगितले की, काल शनिवारी त्यांना भाजपा कार्यालयातून पांडेजींचा फोन आला होता. उद्या त्यांना दिल्लीतील भाजपा  कार्यालयात यावे लागेल आणि पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. रामवीर म्हणाला की माझा यावर विश्वास बसत नाही आणि तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला, असे विचारले, तेव्हा त्याने सांगितले की तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळतो, तिथूनच तुमचा नंबर मिळाला.
Powered By Sangraha 9.0