साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
Saptahik Rashibhavishy
 
 
मेष (Aries Zodiac) : संधीचा लाभ घ्या 
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता या आठवड्यात आपणास, विशेषतः व्यापारी वर्गास काही विशेष अर्थलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरू शकेल. घर, जमीन-जुमल्याचे व्यवहार सफल होऊ शकतील. अचानक एखादी संधी लाभू शकेल. तिचा लाभ घ्यावयास हवा. नोकरी वा व्यावसायिक निमित्ताने प्रवास घडू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात थोडा मानसिक त्रास संभवतो. दगदग, धावपळ यामुळे शरीर व मनावर ताण येऊ शकतो. प्रकृतीला जपावयास हवे. स्पर्धक वा शत्रूंच्या कारवाया वाढू शकतात.
शुभ दिनांक - 14, 15, 16, 17.
 
 
वृषभ (Taurus Zodiac) : करीअरसाठी योग्य संधी
या सप्ताहाच्या सुुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता या आठवड्यात व्यावसायिक लाभाची स्थिती निर्माण होत आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजना हाती घेऊ शकता. नव्या क्षेत्रात पदार्पणासाठी हा काळ उत्तम आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. नवीन तंत्रज्ञान, संकल्पना राबवून आपला व्यवसाय अधिक आकर्षक व सफल करू शकाल. युवा वर्गाला नोकरीच्या द़ृष्टीने या काळात उत्तम योग यावेत. थोडक्यात करीअरच्या दृष्टीने काही कामे व्हावीत. काही युवा वर्गाचे विवाह जुळून येऊ शकतात.
शुभ दिनांक - 15, 16, 19, 20.
 
 
मिथुन (Gemini Zodiac) : व्यावसायिक व्यग्रता, दगदग
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त ग्रहयोग पाहता हा सप्ताह प्रामुख्याने कार्यालयीन आणि व्यावसायिक संधीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. काहींना अतिशय व्यग्रतेचा आणि दगदगीचा हा आठवडा ठरू शकतो. काहींना प्रकृतीच्या दृष्टीने किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. कार्यालयात नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. याचे दीर्घकालीन लाभ अवश्य मिळतील. काहींचे वाहन, स्थावर मालमत्तासंबंधीचे व्यवहारघडून येऊ शकतात. हा संपूर्ण आठवडाच उत्तम व समाधान देणारा ठरावा. विवाहयोग्य मुला-मुलींचे कार्य जुळून येण्याची शक्यता राहील.
शुभ दिनांक - 17, 18, 19, 20.
 
 
कर्क (Cancer Zodiac) : नोकरीत आकस्मिक घडामोडी
या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त ग्रहयोग पाहता हा सप्ताह आपल्या कार्यक्षेत्रात, नोकरीत काही आकस्मिक घडामोडी घडवून आणू शकतो. काहींना एखादी विशेष जबाबदारी सोपविली जाणे किंवा कामाच्या स्वरूपात बदल घडून येणे संभवते. विवाहयोग्य मुला-मुलींचे कार्य जुळून येण्याची शक्यता राहील. घरात पाहुण्यांचा राबता राहील. त्यामुळे आनंदी व उत्साही वातावरण राहावे. आठवड्याच्या शेवटी मोठे आर्थिक व्यवहार जरा जपूनच करावेत. विशेषतः शेअर बाजार, सट्टा बाजारात गुंतवणूक करणार्‍यांनी बाजाराचा कल विचारात घेऊनच पुढे पाऊल टाकावे.
शुभ दिनांक - 15, 16, 18, 20.
 
 
सिंह (Leo Zodiac) : प्रगतीला चालना मिळेल
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त ग्रहयोग पाहता या सप्ताहात काही भाग्यकारक व प्रगतीला चालना देणार्‍या घटना घडू शकतात. व्यवसाय विस्तार, नवी गुंतवणूक वगैरे करता येऊ शकेल. सरकारी नोकरीत किंवा खाजगी क्षेत्रात असणार्‍यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. काहींना बदली होणे किंवा कामात बदल करावा लागू शकतो. व्यवसायात बरीच धावपळ, मेहनत करावी लागू शकते. काही कुटुंबात मात्र एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. खरेदी, सहकुटुंब प्रवास यांची आखणी करता येईल. काहींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पथ्यपाणी सांभाळावयास हवे.
शुभ दिनांक - 16, 17, 19, 20.
 
 
 
कन्या (Virgo Zodiac): जोडीदाराची निवड व्हावी
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेल्या शुभ ग्रहस्थितीमुळे या राशीच्या काही विवाहेच्छू तरुण- तरुणींचे विवाह जुळण्याच्या द़ृष्टीने काही चांगले येऊ शकतील. पसंतीचा जोडीदार निवडता येऊ शकेल. व्यवसायात असलेल्यांना हा आठवडा उत्तम व प्रगतिकारक जावा. काही नवे धाडस करता येऊ शकेल व त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील. विदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना उत्तम योग येऊ शकतात. दरम्यान, या राशीच्या ज्येष्ठ मंडळींनी या सप्ताहात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
शुभ दिनांक - 14, 16, 18, 19.
 
 
 
तूळ (Libra Zodiac) : व्यवसाय विस्ताराच्या संधी
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त झालेले ग्रहयोग पाहता हा सप्ताह या राशीच्या मंडळींना नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगल्या संधी देणारा ठरू शकतो. व्यवसायात असलेल्यांना काही नवे करार करता येऊन व्यवसायाचा विस्तार करता येईल. नोकरीत असलेल्यांना चांगल्या संधी लाभू शकतात. नोकरी-व्यवसायातील आपली प्रतिष्ठा टिकून राहील. कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल. युवा वर्गाला विवाहादी संदर्भात शुभयोग येऊ शकतात. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 14, 16, 19, 20.
 
 
वृश्चिक (Scorpio Zodiac) : समाधानकारक स्थिती
या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त ग्रहयोग पाहता हा सप्ताह आपल्याला साधारणपणे सर्वच बाबतीत समाधान लाभण्याचे योग यावेत. सार्वत्रिक समाधानाचे वातावरण लाभावे. तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम संधी येऊ शकतात. घरात विवाहेच्छू मुला-मुलींचे शुभमंगल जुळून येण्यासाठीच्या हालचालींना वेग येईल. काही दाम्पत्यांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागू शकते. यामुळे कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. उत्तरार्धात मात्र नोकरवर्गाला छुप्या शत्रुंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. अचानक एखादी आव्हानात्मक घटना उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुभ दिनांक - 15, 16, 17, 18.
 
 
धनु (Sagittarius Zodiac) : कामात बदल संभव
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त ग्रहयोग पाहता हा सप्ताह तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम संधी देऊ शकतो. सोबतच तरुणांच्या विवाहाच्या दिशेने कुटुंबात वेगवान हालचाली संभवतात. काहींना त्यांचा जोडीदार या काळात निवडता येऊ शकेल. नोकरी-व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. त्यात फारसे बदल होणार नसले, तरी काहींना अचानक बदली किंवा कामातील बदल स्वीकारावा लागू शकतो. व्यवसायात मात्र तूर्त मोठे बदल होण्याची शक्यता नाही. गुंतवणूक करताना कुठेही आपला पैसा फसणार नाही, याची काळजी घ्यावी.
शुभ दिनांक - 15, 17, 18, 19.
 
 
मकर (Capricorn Zodiac) : गाफील राहू नये
या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त ग्रहयोग पाहता हा सप्ताह आपणास सध्या सारेकाही सुखेनैव चालावे असे योग देत असल्याने काळजीचे कारण नाही. मात्र, साडेसातीदेखील सुरू आहेच. त्यामुळे कोणत्याही क्षणी गाफील न राहण्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायातील वातावरण सामान्य राहील. त्यात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाही. काहींना एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या योजना, नव्या संकल्पना योग्यरीत्या काम करीत असल्याचे दिसेल. प्रतिष्ठा उंचावेल.
शुभ दिनांक - 15, 16, 19, 20.
 
 
कुंभ (Aquarius Zodiac) : उत्तम व्यावसायिक संधी
या आठवड्याच्या सुरुवातीला ग्रहयोग पाहता हा सप्ताह आपल्या कर्मस्थानास बळ मिळत असल्याने आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या उत्तम संधी लाभू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना उत्तम संधी लाभू शकतील. व्यवसायात असलेल्यांचा कामाचा उत्साह दुणावेल. उत्पन्नात वाढ होईल. सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. आपल्या कामगिरीचे कौतुक होईल. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांनाही जोडीदाराच्या मदतीने उत्तम वाटचाल करता येईल. आपले जीवनमान उंचावेल. कुटुंबाचे व मित्रांचे सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 14, 15, 18, 19.
 
 
मीन (Pisces Zodiac) : बेसावध राहू नये
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त ग्रहयोग पाहता हा सप्ताह काहींना नसत्या कल्पनाविलासात रममाण करणारा ठरू शकतो. काहीसा गाफीलपणा निर्माण करू शकतो. हा धोका ओळखला पाहिजे. बेसावध राहू नये. आळस, गाफीलपणा अंगलट येऊ शकतो. व्यवसाय व नोकरीत समाधान लाभणार असले, तरी केवळ दुसर्‍यावर विसंबून राहता येणार नाही. कामाचे व वेळेचे नियोजन करणे फायद्याचे ठरेल. सकारात्मक भूमिकेतून व वक्तशीरपणे केलेल्या कामांमुळे आपली बाजू उंचावेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगावयास हवी. युवकांना विवाहाचे उत्तम योग लाभू शकतात.
शुभ दिनांक - 14, 16, 17, 19.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746