वर्षभरात 87 लग्नविधी, मागील वर्षीपेक्षा 11 तिथी अधिक
दिनांक :14-Apr-2024
Total Views |
गोंदिया,
marriage dates in 2024 अनेक तरुण-तरुणी लग्नासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षात पंचांगकर्त्यांनी तब्बल 87 लग्नतिथी दिल्या आहेत. स्थळ पसंत पडले असेल तर यंदा होऊन जाऊ द्या लग्न, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पंचांगात बघून लग्नतिथी लग्न जमल्यानंतर पंचांगात बघून लग्नतिथी काढली जाते. अनेक जण गुढीपाडव्याला नवीन वर्षाचे पंचांग आवर्जून खरेदी करून आपल्या घरात ठेवत असतात.
चातुर्मासातही लग्न चातुर्मास काळात लग्न करता येत नाही. marriage dates in 2024 पण पंचांगकर्त्यांनी आपत्कालीन स्थितीत गौण काळातील लग्नाच्या तारखा दिल्या आहेत. ज्यांच्याकडे काही अडचण असेल तरच या तारखांचा विचार करावा. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांतील लग्नतिथीसाठी मंगल कार्यालयात बुकिंग केली जात आहेत. मागील 2023 या वर्षभरात 2 मे 2023 ते 5 एप्रिल 2024 पर्यंत पंचांगामध्ये 76 लग्नतिथी देण्यात आल्या होत्या. आता यंदा 18 एप्रिल 2024 ते 8 जून 2025 या कालावधीत 87 लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत 11 लग्नतिथी जास्त आहेत. विशेष म्हणजे दिवाळीनंतर 17 नोव्हेंबरपासून लग्नसराईचा दुसरा टप्पा सुरु होत आहे.