शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवा कृषी संस्कृती

Agriculture-School Students कृषी उपक्रमांचा वापर

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
Agriculture-School Students येत्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी ते बारावीपर्यंत शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याचा राज्यातील महायुती सरकारचा निर्णय केवळ अभिनंदनीयच नसून भविष्यातील कृषी क्षेत्राची वाटचाल बघता दूरगामी परिणाम करणारा व सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे. Agriculture-School Students शेती, पशुधन, काळी माती, पिके, पीक कापणी, बीज, पाणी, खते, हवामान हे खरे तर कृषी संस्कृती हाच आधार असलेल्या भारतीयांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. ‘होते' यासाठी की, जसजसा शहरीकरणाचा वेग वाढला, अत्याधुनिक सुविधा सहज उपलब्ध होऊ लागल्या, विविध उपभोगांची साधने वाढली, शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा उरली नाही, चंगळवाद-भौतिकवाद बोकाळला तसतसा आमचा शेतीशी, काळ्या मातीशी संपर्क कमी झाला, नव्हे शेती-मातीशी असलेली आमची नाळच तुटली. Agriculture-School Students केवळ ‘खा, प्या, मजा करा...' या संस्कृतीमुळे कृषी संस्कृतीचा आम्हाला विसर पडला. प्रचंड शहरीकरणामुळे व तथाकथित आधुनिक संस्कृतीमुळे खासकरून शहरी मुलांना शेती, पीक, पाणी व एकंदरच कृषी क्षेत्राची फारशी माहिती नसते. यात त्यांचा दोष नाही. कारण, त्यांची कृषी घटकांशी नाळ जुळेल असे वातावरणच भोवताली नाही. Agriculture-School Students त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि शेतीची आवड निर्माण करायची असेल तर लहानपणापासूनच त्यांना या गोष्टींबाबत अवगत करणे गरजेचे आहे.
 
 
 
Agriculture-School Students
 
 (संग्रहित छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
 
शेतीविषयक जागरूकता निर्माण करायची असेल तर कृषी शिक्षणाला पर्याय नाही. शहरीकरणाचा वेग वाढला असला, तरी आजही प्रामुख्याने भारताच्या लोकसंख्येसाठी शेती हाच उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत आहे, शेती हाच त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे तसेच देशातील बहुतांश शेतकरी दोन हेक्टरपेक्षा (पाच एकर) कमी असलेल्या छोट्या शेतात उदरनिर्वाह करतात, ही परखड वस्तुस्थिती लक्षात घेऊनच शालेय मुलांना हा विषय शिकवावा लागणार आहे. शेती व्यवसायातील प्रतिकूलता व मिळणाèया अल्प उत्पन्नामुळे अलिकडे शेतीकडे वळण्याची हिंमत शेतकऱ्यांची मुलेही करीत नाहीत, ही विदारक वस्तुस्थिती आहे. या पृष्ठभूमीवर मुलांना शालेय जीवनापासूनच शेतीचे शिक्षण देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच काही मूलभूत व महत्त्वाच्या गोष्टींकडे शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही संकल्पना चांगली असली, तरी याची अंमलबजावणी कशी करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मुलांच्या डोक्यावर आधीच खूप विषयांचे ओझे आहे. परीक्षा, अभ्यास, चाचणी, पुन्हा परीक्षा याच चक्रात सर्व मुले गुंतून जातात.
 
 
त्यामुळे कृषीसारखा दूरगामी परिणाम करणारा विषय शिकवताना तो विषय मुलांच्या मनात ठसला पाहिजे, मुलांना त्याविषयी आवड निर्माण झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषी व कृषीशी संबंधित विविध विषयांमध्येही आपल्याला करीअर घडविता येईल, शेतीला उज्ज्वल भविष्य आहे, हा विश्वास आतापासूनच मुलांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. यासाठी ज्यांना खरोखरच मनापासून कृषी विषयाची आवड आहे, ज्यांना हा विषय शिकविण्यात मुळापासूनच ‘इंटरेस्ट' आहे, जे जीव ओतून मुलांना शेतीसंबंधी ज्ञान सोप्या शब्दात शिकवू शकतील, अशा तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षकांकडेच हा विषय सोपविला पाहिजे व या विषयाला परिपूर्ण न्याय देणारे सक्षम व सृजनशील शिक्षकच यासाठी नेमले पाहिजेत. जर ती काळजी घेतली नाही तर केवळ शासकीय निर्णय म्हणून वा निव्वळ औपचारिकता म्हणून या विषयाकडे पाहिले जाईल व मुलांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ते घातक ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विषय केवळ क्रमिक अभ्यासक्रमापुरताच, पुस्तकी स्वरूपाचा असू नये तर या विषयाला व्यावहारिक ज्ञानाची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे. स्पष्टच सांगायचे झाल्यास हा विषय शालेय पुस्तकापेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन मुलांना अधिक चांगला समजेल, त्यांचे कृषीविषयक आकलन वाढेल.
 
 
त्यांच्यात जिज्ञासा व कुतूहल निर्माण होईल आणि त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल तसेच पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष परिस्थिती यातील फरकही त्यांना समजून येईल. म्हणूनच क्रमिक पुस्तकाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘होम गार्डनिंग', बागबगिचा फुलविणे, पीक पाणी नियोजन, फार्म भेटी इत्यादी व्यावहारिक गोष्टींचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. तसेच विद्याथ्र्यांना साधे भोजन बनवायला शिकवून, विविध कृषी उत्पादने, त्यांचे पौष्टिक फायदे आणि ते संतुलित आहारात कसे योगदान देतात याबद्दलही शिकविणे गरजेचे आहे. आधीच उल्लेख केल्यानुसार शालेय कृषी शिक्षणाला, पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक शिक्षणाची जोड देण्याची नितांत गरज यासाठी आहे की, मुलांना शेतीबद्दल शिकवल्याने त्यांची जीवनावश्यक कौशल्ये सुसज्ज होण्यास मदत होऊ शकेल. त्यांच्यात निसर्गाबद्दल आदर निर्माण होईल आणि आपली अन्नप्रणाली कशी कार्य करते याबद्दल त्यांना अंतर्दृष्टी प्रदान करता येईल. त्यामुळेच शालेय मुलांसाठी ही कृषीविषयक माहिती कोरडी, रुक्ष किंवा जास्त तांत्रिक असण्याची गरज नाही. तर मुलांसाठी अनेक व्यावहारिक तसेच उपलब्ध असलेल्या कृषी उपक्रमांचा वापर केला जाऊ शकतो.
 
 
शालेय मुलांसाठी शेतीविषयक विविध उपक्रम आखल्यास त्यांच्यात अनेक जीवन कौशल्ये विकसित होण्यास मदत होते, हे सिद्ध झाले आहे. यामध्ये संयम (जसे की ते पिकांची वाढ होण्याची वाट पाहतात), जबाबदारी (वनस्पती किंवा प्राण्यांची काळजी) आणि ‘टीमवर्क' (जसे ते गट प्रकल्पांवर एकत्र काम करतात) यांचा समावेश होतो. या कौशल्यांचा त्यांच्या वैयक्तिक आणि भविष्यातील व्यावसायिक जीवनात व्यापक उपयोग होतो, हे देखील सिद्ध झाले आहे. म्हणूनच हा विषय अतिशय गांभीर्याने शिकविण्याची नितांत गरज आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कृषी उत्पादन कसे घ्यावे, काळानुरूप व हवामानानुसार तसेच बाजारपेठेच्या मागणीनुसार कोणती पिके घ्यावीत तसेच ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन म्हणजे काय हे मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शिकविणे गरजेचे आहे. मुलांना शेतीचे हंगामी स्वरूप समजण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे. वर्षाच्या विशिष्ट काळात काही फळे आणि भाज्या मुबलक का असतात हे स्पष्ट केल्याने हवामान, भूगोल आणि वनस्पतींच्या वाढीचे विज्ञान याबद्दल विद्याथ्र्यांना माहिती होऊ शकते. सध्या कृषी शाखेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ०.९३ टक्का आहे. हे प्रमाण किमान तीन ते पाच टक्क्यांवर जाणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
 
कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याने कृषी शिक्षणाबद्दल विद्याथ्र्यांमध्ये ओढ निर्माण होईल. त्यांच्यात शेतकऱ्यांविषयी कळकळ निर्माण होईल. प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी कसे काम करतात हे कळेल तसेच ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. शेती क्षेत्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव नक्कीच महत्त्वाचा ठरेल. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सूक्ष्म सिंचन, कीटकनाशके, खते-बियाणे, पीक पोषण, सेंद्रिय जैविक उत्पादने या क्षेत्रामध्ये विविध कंपन्या व उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. मात्र, या संस्थांना असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. आता शालेय स्तरापासून कृषी विषयाचा समावेश केल्याने कृषी क्षेत्राशी निगडित कुशल मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे शालेय विद्याथ्र्यांना शेतीचे धडे देण्याच्या निर्णयामुळे भविष्यात या क्षेत्रातही अनेक प्रतिभावंत मुले-मुली पुढे येतील व शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.