शेतकरी संघटनेच्या मागण्या शेतकरी हिताच्या नव्हत्या :ललित बहाळे

Buldhana-Election 2024 पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
बुलढाणा, 
 
Buldhana-Election 2024 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केलेल्या मागण्या शेतीमालाचा भाव अर्थसंकल्पीय होत्या त्या अभ्यासपूर्ण नव्हते त्यांच्या मागण्या शेतकरी हिताच्या नव्हत्या. Buldhana-Election 2024 आम्ही केलेल्या मागणीमुळे कापसाला भाव मिळाला. लोकसभा निवडणुकीत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्याशी सांमजस्य करार केल्याने आम्ही त्यांच्यासोबत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बाहाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Buldhana-Election 2024
 
 
 
Buldhana-Election 2024
 
 
Buldhana-Election 2024 बुलढाणा येथील पत्रकार भवनात आज दिनांक 15 रोजी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेचे नामदेवराव जाधव डॉ विनायक वाघ देविदास कणखर सतीश देशमुख वामनराव जाधव विठ्ठल सोळंकी एकनाथ पाटील उपस्थित होते. Buldhana-Election 2024 ललित पाटील बाहळे यांनी सांगितले, शेतकरी हितासाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या संघटना वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलन करीत असतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकारकडे केलेल्या शेती मालाच्या भावाच्या मागण्या शेतकरी हिताच्या नव्हत्या, असा आरोप करीत येत्या लोकसभा निवडणुकीत दहा विषयांवर आमची संघटना रविकांत तुपकर यांच्यासोबत सामंजस्य करार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
Buldhana-Election 2024 याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी जनतेच्या पाठबळावर शेतकरी चळवळीला न्याय देण्यासाठी निवडणूक रिंगणात उभा आहे. मला गारुडी म्हणण्याची व माझ्या नावाने दररोज उलट सुलट अफवा करण्याची वेळ विरोधी उमेदवारावर आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.