लागवड खर्च वाढला, त्या तुलनेत उत्पादन नाही

15 Apr 2024 16:59:05
गोंदिया, 
farmer अलीकडे ‘उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी’ अशा दुष्टचक्रात शेती सापडली आहे. वाढत्या महागाईत शेतात सालगड्यांची मजुरी लाख, सव्वालाखावर पोहोचली आहे. त्यामुळे मजुरांची समस्या निर्माण होत आहे. शेतकरी बैल, बारदाना मोडून शेती ठेका व बटाईने देण्याकडे पुढे सरसावला आहे.
 

cgh 
 
शेतकर्‍यांचे नववर्ष हे गुढीपाडव्याला असते. याच दिवशी सालगडी ठेवणे, शेती बटाईने, ठेक्याने देणे असे शेतीचे वार्षिक नियोजन केले जाते. शेतीसंदर्भातील नियोजन गुढीपाडव्यालाच केले जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून बी-बियाणे, रासायनिक खते यांचे वाढते दर, मजूर टंचाई, रोजगाराची वाढती स्पर्धा, लागवड खर्चातील मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, सालगड्यांची वाढलेली मजुरी, निसर्गावर आधारित शेती, विविध नैसर्गिक संकटे आदी अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात शेती सापडल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. सर्व समस्यांना वैतागून अनेक शेतकरी आपला ‘बैलबारदाना’ मोडीत काढून शेती बटई, ठेक्याने देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सालगड्यांची मजुरी वाढत आहे. परंतु शेतीतील उत्पन्न वाढत नाही. वर्षभर एकाच मालकाच्या घरी काम करण्यापेक्षा चांगला रोजगार मिळवलेला बरा, असा विचार सालगडी करत आहे.
जनावरे झाली कमी
जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र खात्रीचे नसल्याने सर्व भिस्त खरीपावरच असते. पूर्वी ज्यांच्याकडे एक किंवा दोन बैलजोड्या, गायी, म्हशी आदी जनावरे जास्त तो शेतकरी श्रीमंत समजला जायचा.farmer परंतु अलीकडे वाढत्या खर्चामुळे एखादी बैलजोडी, एखादी गाय, म्हैस दुधासाठी ठेवतानाही त्यांच्या नाकी नऊ येत असल्याचे चित्र आहे.
जनावरांना बाजाराचा रस्ता
शेतकर्‍याकडील भाकड जनावरांना बाजारचा रस्ता दाखवला जात आहे. बैलबारदाना कमी करून शेती ट्रॅक्टरच्या मदतीने करण्याचा प्रयोगही अनेकजण करत आहेत. जास्त पैसे खर्च झाले तर शेतीकामे लवकर होत असल्याने म्हैस, गायी, वासरे, कालवडी, गोर्‍हे, यांची बाजारात कवडीमोल दरात विक्री करताना शेतकरी दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0