लोकशाही कोणीही संपवू शकत नाही

15 Apr 2024 17:37:26
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नागपूर,
Devendra Fadnavis इंदिरा गांधींनी भारतातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना 2 वर्षे तुरुंगात डांबून ठेवले होते.मुळात भारताच्या रक्तात लोकशाही असल्याने लोकशाही कोणीही संपवू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस क्लब येथे पत्रपरिषदेत केले.
 
 
Devendra Fadnavis
 
लोकशाही धोक्यात असल्याचा दावा काँग्रेसकडून वारंवार केल्या जात आहे. मात्र अशाप्रकारचे तथ्यहीन आरोप करणे पूर्णत: मूर्खपणाचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सत्तेत आल्यानंतर अग्निवीर योजना रद्द करू, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगत आहे. मात्र अग्निवीर योजना देशाच्या संरक्षणासाठी आणली असताना अशी योजना रद्द करणे म्हणजे भारताला धोक्यात घालणे होय. काँग्रेसचे आश्वासन फोल ठरले मोदींची गॅरंटी म्हणजे शंभर टक्के योजना अंमलात आणल्या जाते.आतापर्यंत छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, कर्नाटक या राज्यात काँग्रेसने दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. Devendra Fadnavis त्यामुळे काँग्रेसने दिलेले सर्वच आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचे रक्षण करण्याचे कार्य गेल्या 10वर्षात केले आहे. तरी सुध्दा विरोधक संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप करीत आहे. लोकसभेच्या निवडणूकीदरम्यान मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून दररोज केल्या जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
 
 
नागरिकांना न्याय देणे, ही मोदींची गॅरंटी
देशाच्या सर्वांगिण विकासासोबतच जनतेसाठी कल्याणकारी योजनांची गॅरंटी मोदींनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला संकल्प जाहीर केला असून एक देश, एक निवडणूक आणि समान नागरी कायदा लागू करण्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट सांगितले आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणे, ही मोदींची गॅरंटी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्ण होत आला असून पुढील पाच वर्षात देशाच्या पूर्व, दक्षिण व उत्तर भागात बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे सर्वेक्षण केल्या जाणार आहे. यावेळी पत्रपरिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0