'एक ही दिल है कितनी बार जीतोगे' VIDEO

15 Apr 2024 10:52:00
मुंबई,
Ek Hi Dil Hai Kini Baar Jitoge धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये केलेल्या करिष्माने चाहत्यांना भुरळ घातली आहे.धोनीने हार्दिक पांड्याविरुद्ध 4 चेंडू खेळले आणि सलग तीन षटकार मारून एकूण 20 धावा केल्या. वानखेडेवर उपस्थित प्रत्येक प्रेक्षक पुन्हा एकदा 2011 च्या विश्वचषक फायनलच्या आठवणींमध्ये हरवून गेला. एकीकडे धोनीने लागोपाठ तीन षटकार मारून चाहत्यांची मने जिंकली तर दुसरीकडे तुफानी इनिंग खेळून धोनीने छोट्या चाहत्यांचीही मने जिंकली.  वास्तविक, 20 धावांची तुफानी इनिंग खेळल्यानंतर धोनी पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या चढत असताना धोनीने पायऱ्यांवर पडललेला बॉल एका मुलाला उचलून दिला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
आमच्या यंग विकेटकीपरने कमाल केली...ऋतुराजने केले धोनीचे कौतुक 
dhoni
 
रोहित शर्माचा वानखेडेवर तुफानी शतक  धोनीच्या या औदार्याचे चाहते कौतुक करत आहेत. CSK ने सामन्यात मुंबईचा 20 धावांनी पराभव करून चौथा विजय मिळवला. या सामन्यात सीएसकेचा गोलंदाज पाथिरानाने अप्रतिम गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या, पथिरानाला सामनावीराचा किताब देण्यात आला. Ek Hi Dil Hai Kini Baar Jitoge सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, CSK ने प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या, त्यानंतर मुंबई इंडियन्स संघ 186 धावा करू शकला. रोहित शर्माने 63 चेंडूत 105 धावांची खेळी केली पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. रोहितने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 5 षटकार मारले होते. रोहितचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे. या विजयासह CSK गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर पराभवानंतर मुंबई आठव्या स्थानावर कायम आहे.  'विकेटमागून रणनिती सुरु होती....हार्दिकने सांगितले कारण
 
 
Powered By Sangraha 9.0