चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांची प्रचारात आघाडी

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर
Mungantiwar चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत असून वणी येथील धनोजे कुणबी समाज संघटना, रजनीकांत बोरले मित्र मंडळ या दोन्ही सामाजिक संघटनेसह प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीने महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे. लोकसभा निवडणूक पृष्ठभूमीवर मुनगंटीवार यांनी पांढरकवडा व वणी तालुक्यांना भेटी देत अनेक संघटनांशी संवाद साधला. यावेळी धनोजे कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून आपला जाहीर पाठींबा दिला.
 

मुनगंटीवार  
 
संध्या नांदेकर, रुंदा नगरकर, रुंदा केचे, स्वप्ना बोंडे, स्नेहा झाडे, एकटा झाडे, सुचिता आसेकर, सोमा गाडगे, नीता तिवारी यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला. तर मागील अनेक वर्षांपासून वणी येथे सामाजिक कार्य करीत असलेल्या रजनीकांत बोरले मित्र मंडळ कार्यरत आहे. या संघटनेचे प्रमुख रजनीकांत बोरले यांनी मुनगंटीवार यांना पाठींबा देत जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचा संकल्प केला. यावेळी आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. डॉ. अशोक उईके, शंकर बडे, डॉ. अंगाईतकरसह अनेक नेते उपस्थित होते. त्याचसोबत प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीने लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. याप्रसंगी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे विदर्भ अध्यक्ष रेवनाथ वालदे, विदर्भ सचिव राकेश निमसरकारी, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मेसरे, अखिल गेडाम, जीवन निमगडे, जितेंद्र करमनकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.Mungantiwar वणी, झरी, पांढरकवडा, मारेगाव तालुक्यातील भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टतर्फे स्नेहमिलन सोहळा आयोजित करून मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी मुनगंटीवार यांनी केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टच्या अडचणी सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रसंगी प्रदेश संयोजक श्रीकांत दुबे, मुकुंद दुबे, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोरडे, रवी येरणे, लक्ष्मण उरकुडे, शंकर नागदेव, बाबाराव बोबडे, धनंजय जोशी यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.