पीएम फंडाची चौकशी झालीच पाहिजे : नितेश राणे

15 Apr 2024 21:22:55
मुंबई, 
संजय राऊतांनी पीएम फंडाच्या चौकशीची केलेली मागणी अगदी योग्य असून, उद्धव ठाकरेंच्या संबंधित असलेल्या ‘पाटणकर-मातोश्री’ (पीएम) फंडाची चौकशी व्हावी, अशा शब्दांत भाजपा आमदार Nitesh Rane नितेश राणे यांनी खोचक चिमटा काढला. ज्या पीएम फंडमुळे कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची मदत झाली, समाजातल्या लोकांना ज्याचा मोठा आधार आहे, त्या फंडवर बोट उचलण्याअगोदर उद्धव ठाकरेंच्या पीएम फंडाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
Nitesh Rane m
 
उद्धव ठाकरेंचा पीएम फंड म्हणजे ‘पाटणकर-मातोश्री’ फंड. त्याचे मुख्य कार्यालय हे कलानगरमध्ये असलेल्या वैभव चेम्बर्सच्या चौथ्या माळ्यावर आहे. उद्धव ठाकरे मु‘यमंत्री असतानाच्या काळात या ‘पाटणकर-मातोश्री’ फंडमध्ये किती पैसा आला, कुठून आला, नंदकिशोर चतुर्वेदींकडून किती पैसा आला, त्याचीही चौकशी व्हायला हवी. संजय राऊत यांनी स्वतःच्या एक्स अकाऊंटवर ‘चंदा दो और धंदा करो’ असे लिहिले आहे. मग तुमच्या मालकाने कुठून चंदा गोळा केला, कुठला काळा धंदा चालू होता, असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
 
 
वैभव चेम्बर्सच्या चौथ्या माळ्यावर कुठल्या वहिनी आपल्या भावाबरोबर बसतात आणि कोणते मोठमोठे व्यवहार तिथे होतात, या फंडातला पैसा उद्धव ठाकरेंच्या कर्जतच्या फार्महाऊसमध्ये कुठे ठेवला आहे, किती जमिनीच्या खाली खोदून ठेवला आहे, या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, असे Nitesh Rane नितेश राणे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0