संत नामदेवांचा राम...!

Ram-Namdev-GranthSahib देशभर भागवत धर्माचा प्रचार

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
वेध
 
- अनिरुद्ध पांडे
Ram-Namdev-GranthSahib आपल्या महाराष्ट्राला फार मोठी संतपरंपरा आहे. या संतपरंपरेत बहुतांश संत हे कवीही होते. या साऱ्यांमध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतकवींचे कार्य अद्वितीय असेच आहे. आज शतकानुशतके या संतांची काव्यरूपातील अमृतवाणी मराठी मनाला संजीवनी देत आली आहे. Ram-Namdev-GranthSahib हे पाच संत म्हणजे महाराष्ट्री जीवनाचे पंचप्राणच म्हणावे लागतील. यांचे साहित्य हे लोकांसाठी निर्माण झालेले असून ते घरोघरी आवडीने वाचले जाते. यांच्यापैकी संत नामदेव महाराजांच्या कर्तृत्वाचा तर एक आगळाच व देदीप्यमान पैलू आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे समकालीन. Ram-Namdev-GranthSahib तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील संतकवी. त्या काळात नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन भागवत धर्माचा प्रचार गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, बिहार इत्यादी प्रांतात केला. भागवत धर्माची धवल पताका सर्वत्र फडकावली. त्या-त्या काळातील समाजाचे कान टोचण्याचे, त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करण्याचे, त्यांचे सामाजिक भान जागे करण्याचे काम या साऱ्याच संतांनी केले आहे.Ram-Namdev-GranthSahib
 
 
 
Ram-Namdev-GranthSahib
 
 
प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण या संतांचे दैवतच असून त्यांचा आधार घेत ते समाजाला जागेवर आणत. संत नामदेव म्हणतात पहा, Ram-Namdev-GranthSahib
मुखी नाही नाम। काय जपतो श्रीराम।
काय आसन घालून। मुखी नाही नारायण।
टिळे टोपी माळा दावी। भोळ्या भाविकांसी गोवी।
नामा म्हणे त्याचा संग। नको चित्ता होय भंग।।
संत नामदेवांच्या आयुष्यातील ५० हून अधिक वर्षे त्यांनी देशभर भागवत धर्माचा प्रचार केल्याची नोंद आहे. जे इतर कोणाही मराठी संतांनी केलेले नाही. त्यांच्या विविध प्रांतांमधील कामाची दखल तेथील रामानंद, कबीर, नानक, रैदास, पीपा अशा संतांनी आपल्या लिखाणात आवर्जून आणि आदराने घेतली आहे.
अखंड मुखी रामनाम। धन्य तयाचाचि जन्म।
स्नान संध्येसी नेम। तो पुरुष महापवित्र।।
धन्यधन्य तयाचा जन्म। रामार्पण अवघे कर्म।
तोचि तरला हाचि नेम। रामकृष्ण उच्चारणी।।
अनंत जन्माचे साकडे। तेणेचि उगविले कोडे।
जपतप येणे नावडे । रामकृष्ण उच्चारणी।।
नामा म्हणे नाममात्रे। अवघी निवारली शस्त्रे।
रामकृष्ण नाम ववगे। उच्चारी तो धन्य।।
 Ram-Namdev-GranthSahib
 
 
असे सोप्या शब्दांमध्ये रामनामाचे माहात्म्य सांगणाऱ्या संत नामदेवांचा पंजाबात मोठा शिष्य परिवार होता. पंजाबातील घुमान या गावी नामदेवांचे स्मारक असून ते ‘गुरुद्वाराबाबा नामदेवजी' या नावाने प्रसिद्ध आहे. शिखांच्या ‘गुरुबाणी'तही संत नामदेवांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे. पंजाबात बहुतेक शिंपी ‘नामदेव संप्रदायी' असून त्यांना तिकडे ‘चिंबा' असे म्हणतात. पंजाबात अनेक भागात नामदेवांची मंदिरे आहेत. सारेच कसे मन भरून आणणारे..! Ram-Namdev-GranthSahib प्रचाराची आणि प्रवासाची फारशी साधने उपलब्ध नसताना नामदेवांनी केलेले कार्य आश्चर्यजनकच आहेत. हे कार्य करताना त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ नव्हता. ज्यांच्या मुखी विठ्ठल आहे, त्यांचे कल्याण व्हावे एवढीच देवापाशी त्यांची प्रामाणिक मागणी होती. प्रभू रामचंद्र आणि त्यांचे जीवन हा तर संत नामदेवांचा श्रद्धेचा व जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी काव्यरूपात संक्षिप्त अशी संपूर्ण रामकथा लिहिली आहे.
‘कुलगुरू वशिष्ठ सांगे नृपवरा। असती गरोदर तुझ्या कांता।। Ram-Namdev-GranthSahib
धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे। त्यांचे पुरवावे मनोरथ।।'
अशी नामदेवांच्या श्रीराम कथामाहात्म्याची सुरुवात आहे.
राम हेचि स्नान, राम हेचि ध्यान। राम घडे यज्ञ कोटी देखा।
न लगती साधने नाना मंत्रविवेक। रामनामी सुख रंगी कां रे।
नामा म्हणे नाम हेचि वचन। नित्य ती पौर्णिमा सोळा कळी।।
असेही अगदी सोप्या शब्दांत संत नामदेव सांगतात.
 
 
Ram-Namdev-GranthSahib शिवशंकरांसोबत रामकृष्ण आणि विठ्ठलाचेही निस्सीम भक्त असलेल्या नामदेवांनी तर सहा कडव्यांची एक रामाची आरतीच रचली आहे. त्यातील काही ओळी अशा,
रामा राजीव लोचना। करुणानिधी भक्तजना।
यातायाती निवारणा। तूं पावना स्वामिया।।
जगद्रूपा जलदगहना। जगद्गुरू सीतापती जगज्जीवना।
काय वाणूं तुझिया रे गुणा। अवघ्या जनां आवडसी।।
असे हे रामकथेतून राममाहात्म्य सांगणारे श्रीसंत नामदेव एका अर्थाने महाकवीच म्हणावे लागतील. तसे पाहिले तर ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आणि रामदास हेही सारेच महाकवी. Ram-Namdev-GranthSahib नामदेवांनी रामासोबतच श्रीकृष्णलीला, श्रीविठ्ठल माहात्म्य, पंढरी माहात्म्य, श्रीविठ्ठलस्तुती, शिवराम माहात्म्य व शिवस्तुती, तुळशी माहात्म्य, गंगामाहात्म्य अशा विविध विषयांवरील काव्य रचले आहे. हे सारेच संतकवी महाकवी होते. त्यांच्या एकूणच अफाट प्रतिभेमुळे आणि भक्तीचा झपाटाच असा काही होता की, आज पाचसातशे वर्षांनंतरही हे सारे आम्हाला देवाप्रमाणेच पूजनीय आहेत. Ram-Namdev-GranthSahib
९८८१७१७८२९