काँग्रेसच्या अपप्रचाराचा बुरखा जनताच फाडणार

आ. डॉ. रामदास आंबटकर प्रतिपादन Ramdas Ambatkar

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
गडचिरोली,
Ramdas Ambatkar काँग्रेसच्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नसून जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास नितीवर विश्‍वास आहे. गेल्या दहा वर्षापासून गरीब, सामान्य, शोषित, पीडित, शेतकरी आणि अत्यंत खालच्या वर्गातील लोकांसाठी मोदी सरकारने विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या खोट्या प्रचाराचा बुरखा जनता फाडल्याशिवाय राहणार नाही, असे मत विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी व्यक्त केले आहे.
 

Ramdas Ambatkar
 
 
काँग्रेसने समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करुन खोटे पत्रकं काढून जनतेची दिशाभूल करुन लोकांना 70 वर्ष मुर्ख बनविले. मात्र आता जनतेने मोदींच्या कमळावर विश्‍वास ठेवून मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. गडचिरोलीत लोकसभेमध्ये सुद्धा जनतेचा कौल हा भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या बाजूने आहे. लोकांचा विश्‍वास नरेंद्र मोदींवर आहे. ते चुकीचे काहीही करणार नाही, याची जाण सामान्य नागरिकांना आहे. त्यामुळेच गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस नेत्यांना लोकांनी घरचा रस्ता दाखवला आहे, अशीही स्पष्टोक्ती आमदार आंबटकर यांनी दिली आहे. अत्यंत दुर्लक्षित जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे बघितले जात होते. मात्र या जिल्ह्याच्या विकासाची सुरुवातच भाजपाने केली आहे. या जिल्ह्यातील एकमेकांना जोडणारे रस्ते असोत, या जिल्ह्याच्या शैक्षणिक क्रांतीत पाऊल टाकणारे गोंडवाना विद्यापीठ असो किंवा या जिल्ह्यातील सुरजागड लोहप्रकल्प असो, या जिल्ह्यातील नद्यांवरील पूल असोत किंवा या जिल्ह्यातील नक्षलवादाविरुद्धचा लढा असो, या जिल्ह्याच्या रेल्वेचा प्रश्‍न असो या सर्व विकासकामांचे श्रेय भाजपला जाते, आणि याची जाण गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना आहे.Ramdas Ambatkar सामान्य जनता मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत भाजपच्या कमळ चिन्हाची बटन दाबून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, यात कुठलीही शंका नसल्याचेही डॉ. रामदास आंबटकर म्हणाले. लोकसभेचे उमदेवार अशोक नेते निवडून आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात लवकरच विमान धावपट्टीच्या व रेल्वेच्या प्रकल्पांना सुरुवात होईल. सामान्य जनतेच्या प्रश्‍नांना न्याय दिला जाईल. हा जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रस्थानी पोहोचेल. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवावे लागेल, असेही दै. ‘तरुण भारत’शी बोलताना ते म्हणाले.