श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून 500 कोटींचा भ्रष्टाचार

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
- संजय राऊत यांचा आरोप

मुंबई, 
मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते Sanjay Raut संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ते म्हणाले, श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना रोख स्वरूपात मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. पण, श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा लेखाजोखा केवळ 55 लाख रुपयांचा असल्याने यांनी दावा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्च कसा आणि कुठून केला. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या,
 
 
Sanjay Raut-Srikant Shinde
 
त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा. शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकीय मोफत उपचार करते, असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या, त्यांची पृष्ठभूमी काय, ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय? भ्रष्टाचार संपवणे हे आपले प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच अनुषंगाने संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे भ्रष्टाचाराची माहिती दिली. यासंदर्भात दिलेले पत्र त्यांनी ट्विट केले. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक उलाढालीसंदर्भात माहिती माहिती अधिकारात अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला मागितली होती. पण, दीड महिना लोटूनही माहिती त्यांना दिली जात नाही. धर्मदाय आयुक्तांवर प्रचंड दबाव आहे. या दबावातून ते मला या भानगडीत पाडू नका, असे म्हणत, राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा आरोप Sanjay Raut संजय राऊतांनी केला.